निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला
कवितेचा जन्म कवी कल्पनेत साकारला
तमा न कसली न फिकीर कशाची
कवीच्या अंतरी नसते कमी शब्दांची
कवी मन असते वेगळे हळवे हृदयी
म्हणुनच सुचतात काव्यमाला कवी मनातुनी
वेदनांचे अंगार भावनांचा कोरडा बाजार पाहता
मोहरतात जाणिवा कवीच्या अलगद मनात तेव्हा
कुठलेही काव्य करतो कवी अंतरातुनी
शब्दांची मात्रा चालते कवीच्या श्वासातुनी
पेटतो दाह उडतात अनेक जळत्या ठिकऱ्या
कोमजते कवी मन न कळते कुणास कवी भावना
परी कवितेवर प्रेम करतो कवी शब्दातुनी जरा
इतरांच्या अव्यक्त भावनांना साकार करतो सदा
दुःखाचे उमाळे मनाचे करपणे भावना विरता
कवीच्याही आयुष्यात असतात अनेक वेदना
परी कवी निर्मितो शब्द सांधून काव्यांला
रसिकांना आनंद देतो कवी कवितेतून हलकासा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply