निळ्या काळ्या यमुनेतीरी,
कृष्ण राधेशी अनुनय करी, अंधारातून वरून बघती,
चंद्र- चांदणी चमकू लागती,||१||
संधिकाली नीरवताही,
निर्जनताही भोवताली,
कान्हा वाजवी मुरली,
राधा भान हरपली,–!!,||२||
बघतां बघतां तम लागे चढू,
ओढ जिवांची की आत्म्यांची,
दोघांसह येईना मुळी कळू,
मागे टाकला संसार पती,
टाकून सारे तिथेच ती,
धावली कशी यमुनातीरी,–!!||३||
काय आहे कृष्ण म्हणजे,
अशी ओढ कशी अनावर,
घडते तरी का असे,–?
नाद मुरलीचा ऐकून,सत्वर-!! ||४||
शरीर आणि मन तिचे
उगी थरकांपू लागे,
इतक्या बोचऱ्या थंडीतही,
कसा घाम फुटू लागे,–||५||
भीतीने बावरे, थरथरे,
गालांतच हसे कान्हा,
पुढे येऊनी कवेत घेई,
प्रसंग विहंगम हा,—!!!||६||
मोह-माया असे भेटती,
प्रणयाची खेंच न्यारी,
गोरीपान राधा लाजरी,
धीट किती कृष्णमुरारी,–!!||७||
शृंगाराची तऱ्हा वेगळी,
सहवासाची गंमत फाकडी,
एकरुपता समागमाची,
बघून मिटे संकोचून कळी,–!!||८||
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply