नव्हतो कधीही चित्रकार, परि छंद लागला
रंगाच्या त्या छटा पसरवितां, मौज वाटे मनाला…१,
रंग किमया बदण्या नव्हता, मार्गदर्शक कुणी
गुरुविना राहते ज्ञान अपूरे, याची खंत मनी…२
नदिकाठच्या पर्वत शिखरी, विषण्ण चित्त गेलो
मन रमविण्या कुंचली घेवून, चित्र काढू लागलो…३
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, रंग छटा शिकवी
गुरू सापडला चित्र कलेतील, हाच तो निवावी….४
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply