प्रफुल्लित ते भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं
गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं…१
खेळत होता दिवसभर तो, इतर चिमुकल्या मित्रांसंगे
खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे…२
सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली
भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३
निद्रेच्या तो आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने
येणाऱ्या त्या दिवसा विषयी अजाण होता संपूर्णपणे….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply