नवीन लेखन...

निरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती

स्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे केलेले चिन्तन…..बालपणापासुन अश्या खुप सार्‍या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्‍या घटना स्मरण करुन देतात.

काही आठवणी सुखाच्या तर काही आठ्वणी दु:खाच्या…पण सुखापेक्षा ही आपण जास्त स्मरण करतो ते म्हणजे दु:ख, त्यात कधी आठवतो कुणीतरी केव्हातरी केलेला अपमान, कधी कुणी केलेला तिरस्कार तर कधी काळी कुणापासुन झालेला विरह…….

का? कशासाठी? असं दु:ख स्मरण करुन ते सतत चिंन्तुन खरेच कमी होईल का ??? आपल्याला खरेच समाधान मिळेल? आपल्या मनाला शांती मिळेल का? नाही….दु:खं देऊन निघुन गेलेले क्षण स्मरण करुन आपल्याला आलेल्या आसवांनी आपण हयात असलेला आनंद पुसुन टाकतो. स्वत:हुन चालत आलेल्या सुखाचे आपण मनात असलेल्या दु:खामुळेच आदरातिथ्य करण्याचे टाळतो.

विस्मरण होते ते फक्त याच गोष्टींचे ते म्हणजे कधी काळी कुणीतरी खुप मायेने केलेल्या कौतुकाचे, तर कधी काळी कुणीतरी, आपण त्या व्यक्तीसाठी किती महत्वाचे आहोत, ही करुन दिलेली जाणीव, कधी कुणी दिलेले पाठबळ, कधी कुणी दिलेला आशीर्वाद, कधी कुणी केलेले सांत्वन, कधी कुणी आपल्या सुखासाठी केलेली तडजोड आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे गरज असताना कुणी कधी आपल्याला केलेली मदत…..आपण कुणाचीतरी घेतलेली मदत, थोडक्यात म्हणजे विसरतो ते उपकार…………केलेल्या उपकाराबद्दल मनात कृतज्ञता बाळगायला आपण विसरतो. एखादयाचे उपकार स्मरण ठेवणे हीच उपकारांची परतफेड असते, उपकार केलेल्या व्यक्तीसाठी समाधान असते आणि तीच परमेश्वरासाठी केलेले खरी प्रार्थना असते. सकाळी उठल्यावर आधी स्मरण होते ते म्हणजे “काल असे का घडले” आणि विस्मरण होते ते म्हणजे “आजही माझा श्वास माझ्यासोबत आहे”. मला एक नवीन सकाळ मिळाली आहे, नवीन जिवन मिळाले आहे जे पुन्हा सुंदर विचांरानी मी नव्याने जगु शकते.

कृतज्ञता ही एक खुप सुंदर भावना आहे. मनात निर्माण होणारी आदरणीय भावना आहे. जीवनामध्ये लहान असल्यापासुन ते मोठे होईपर्यंत अनेकांचे कळत-नकळत आपल्यावर उपकार होत असतात. पण आपण त्याची स्वतःहुन आपल्या स्वत:ला कधीही जाणीव करुन देत नाही. स्वत:ला कधीही स्मरण करुन देत नाही. मानाअपमानाबद्द्लची सुड्भावना मात्र सदैव स्मरण होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा स्मरण करुन तोच भुतकाळ आपण पुन्हा पुन्हा जगतो आणि विचारांनी नकारात्मक होतो. म्ह्णजेच विचारांची पायरी चुकते आणि आपल्या पुढच्या आयुष्याची जडणघडण होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. या अडचणी नकोत म्हणुनच सदैव मनात चांगल्या गोष्टींचे स्मरण होणे खुप गरजेचे आहे. यासाठी स्मरण भक्ती असावी जी ध्यानातुनच मिळते. ध्यान करुनच मनामध्ये स्मरण भक्ती वाढते. भक्तीनेच स्मरण शक्ती वाढते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी ध्यानभक्ती खुप महत्वाची आहे. ध्यानातुनच मनावर योग्य असे संस्कार होतात. योग्य अश्या संस्कारांमुळे सवयी बदलतात. मनाला चांगल्या सवयी लागल्या कि जीवन खुप सुंदर घडते.

— स्वाती पवार 

 

 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..