नवीन लेखन...

निरंजन – भाग ५४ – का नाते जोडिसी…काळोखासी…

यशोदेच्या बाळकृष्णाने अंगणातील माती मुखी घातली आणि खाऊ लागला…. तोच यशोदेची नजर तिथे जाताच, तिने जोरात तिथे धाव घेतली आणि आपल्या बाळकृष्णाचे माती लागलेले हात आपल्या पदराने पुसले. त्याचे मुखही स्वच्छ केले. माती तोंडात तर गेली नसावी, या संशयाने आपल्या बाळकृष्णाला तोंड उघडे करून दाखवायला सांगितले. आणि जेव्हा बाळकृष्णाने आपले तोंड उघडे करून दाखवले. तेव्हा हे सर्वांनाच माहिती आहे, की बाळकृष्णाच्या मुखात यशोदेला साक्षात सूर्य, चंद्र, तारे यांनी सजलेल्या अशा असंख्य आकाशगंगा दिसल्या. अखंड ब्रह्मांड दिसले. उघड्या डोळ्यांनी नीट बघू शकणार नाही. असं भव्य दिव्य तेज दिसलं. प्रकाश दिसला. हे सर्व काय असावं? ही आपल्या अंतर्मनाची शक्ती…. जी साक्षात भगवंताने बालरूपामध्येच आपल्याला जाणीव करून दिली.

ज्या शक्तीची परमेश्वराने आपल्याला लीला दाखवली, ज्या शक्तीला आपण बाहेरच्या काळोखात शोधत आहोत. ती आपल्या अंतरी सामावलेली आहे, अंतर्मनात लपलेली आहे. फक्त तिला जागृत करता आलं पाहिजे. जे फक्त ध्यान चिंतनानेच शक्य आहे. अंतर्मनाची चेतना जागृत करण्यासाठी आपल्याला ध्यान खुप गरजेचं आहे. आपल्यातलं ब्रह्माण्ड आपल्याशीच संवाद साधण्यासाठी आपण ध्यान करणं खुप महत्वाचं आहे.  अंतर्मनातल्या प्रकाशामध्ये जी दुर्मिळ गोष्ट आपल्याला सापडू शकते. ती बाहेरच्या काळोखामध्ये शोधण्यात आपण आपला वेळ व्यर्थ घालवत आहोत. म्हणूनचं बाहेरच्या काळोखाशी नातं न जोडता अंतर्मनातल्या प्रकाशाशी नातं जोडणं, म्हणजे साक्षात ब्रह्माण्डाशी नाते जोडण्यासारखे आहे.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..