निरांजनात मी ज्योत,अखंड सारखी तेवत,
पुढे माझा भगवंत,
नतमस्तक मी राहत,–!!!
मी समईतील वात,
झिजत राहते सतत,
चाल माझी मंद-मंद,
उजेडाचे रक्षण करत,–!!!
मी पणतीतील ज्योत,
मंद तरीही ठळक,
तमाला मात देत,
सर्वांना मार्ग दाखवत,–!!!
चिमणीतली मी ज्योत,
इवलीशी पण काम करत,
धीमी – धीमी प्रकाशत,
भोवताल थोडा दाखवत,–!!!
मी घरातली लेक,
वाढले लाडांकोडांत,
तेज माझे प्रखर,
विश्वाला चकित करत,–!!!
*मी घरातली सून ,
कर्तव्ये सारी निभावत,
दिवस-रात्र की कष्टत,
परसुखासाठी जळत जळत*,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply