नवीन लेखन...

निर्लज्ज

भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली…

आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली…

माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली

तरीही मला लाज नाही वाटली….

लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची…!

त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं…

आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं…

त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला

तरीही मला लाज नाही वाटली….

लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची…!

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान  कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली…

तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली

तरीही मला लाज नाही वाटली ….

लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची…!

बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली…

बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला

तरीही मला लाज नाही वाटली….

लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची…!

एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं…

फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली…

मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली…

त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.

तरीही मला लाज नाही वाटली….

लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची…!

समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या…

पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली…

शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली…

प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला

तरीही मला लाज नाही वाटली….

लाज माझ्या नादान शिवभक्तीची…!

गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला…

आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला…

डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.

तरीही मला लाज नाही वाटली….

लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची…!

२६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली…

पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या…

त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले…

माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले

तरीही मला लाज नाही वाटली….

लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!

आणि अजूनही मला लाज नाही वाटत….

माझ्या निर्लज्जपणाची…!!!

 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..