शरीर निरोगी असतां तुमचे, नामस्मरण ते करा हो प्रभूचे
ठेवू नका कार्य उद्या करिता, हाती काय येई वेळ गमविता
शरिराच्या जेव्हा नसतात व्याधी, राहू शकतात तुम्हीच आनंदी
आनंदातच सारे होवू शकते, प्रभू चरणी चित्त लागून जाते
व्याधीने जरजर होता शरिर, कसे होईल मग ते चित्त स्थिर
स्थिरांत दडला असूनी प्रभू तो, स्थिर होवूनीच बघता येतो
नाशवंत असता देह तुमचा, व्याधीयुक्त होणे गुणधर्म त्याचा
कोण देईल उद्याचा भरवसा, उमटू दे मनी आंत प्रभूचा ठसा
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
Leave a Reply