नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौवीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

शिरा ताणून बोलू नये
“अरे मला ऐकायला येतंय, उगाच शिरा ताणून बोलू नये. डोके दुखायला लागेल. गळ्याच्या शिरा किती फुगतायत बघ.” ही आईची नेहेमीचीच शिरा ताणून ओरड सुरू असते.

शिरा ताणून बोलायची सवय वाईटच. आपण मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपण खरं बोलतोय, किंवा दुसऱ्याला ते पटतंय, असं वाटणं, हा निव्वळ भ्रम आहे.

बोलताना मनावरचा संयम वाणीमधे दिसला पाहिजे. मनातील रागादि रिपु वाणीतून प्रकट होता नये. तावातावाने बोलल्यामुळे डोक्यातील सर्व सूक्ष्म इंद्रिये ताणाखाली येतात. अनावश्यक दाब तयार होतो. जो दाब बोलून गेल्यानंतरदेखील काम करीत राहातो. असं वारंवार झालं तर नुकसान होणारच !

उगाच वाद ओढवू नये
म्हणजे आ बैल मुझे मार. समोरचा स्वभावाने कसा आहे, हे आपल्याला जर नीट कळलेले असेल तर, त्याच्याशी कसे बोलावे, त्याच्याशी कसे वागावे, याचा विवेक करता यायला हवा. जेवढे शब्द जपून वापरता येतील, तेवढे जपून वापरावेत, नाहीतर अर्थाचे अनर्थ होतात. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या नावाखाली एक काव्य वाॅटसपवर प्रसारीत होत आहे, शब्द तासून बोलावा.वगैरे… खरं आहे ते !
बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून मग शांतपणे बोलावे.

पण गरज असेल तेव्हा न बोलणे हा अवगुण देखील आहे. काहीवेळा आपल्या बोलण्यातील धार दाखवून पण द्यायला लागते. समर्थ म्हणतात,
ठकासी पाहिजे ठक
खटनटासी खटनट
हुंब्यासी हुंबा
लावूनी द्यावा.
आपण कोणाशी वाद करायला जाऊ नये, पण वाद करायला कोणी आलाच तर शिंगावर घेण्याची तयारी पण हवी.
आई नेहेमी सांगते. शाळेत “उगाच” भांडू नकोस. त्या वाक्याचा अर्थ आता कळतोय. जर भांडायची वेळ येईल, तेव्हा उगाच गप्प पण बसू नकोस. असंही तिला सांगायचं असतं.

वाद घालण्याची पण एक कला असते. आयुर्वेद महाविद्यालयात पदार्थविज्ञान या विषयात, “तंत्रयुक्ती” नावाचा एक प्रकार शिकायला मिळतो. याचा नीट अभ्यास केला तर, आपले म्हणणे समोरच्या व्यक्तींना समजावून सांगता येते. आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना पदार्थविज्ञान हा खरंतर “ऑप्शनला” टाकलेला विषय. हे असले विषय कशाला घेतले सिलॅबसमधे य्यार ! असं म्हणून या विषयाची जागा त्याला दाखवून दिलेली असते, पण पुढे व्यवहारात रुग्णाला आपले म्हणणे समजून सांगायला, पदार्थविज्ञान हाच विषय काम करतो, हे आता लक्षात येतेय.

काही गोष्टींचे महत्त्व कळण्यासाठी, काही काळ जाणं आवश्यक असतं. असंही आई म्हणायची, तेही खरंच आहे म्हणा !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१३.०८.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..