नवीन लेखन...

निसर्ग प्रकोप

घे थोडी विश्रांती आता
घे थोडी उसंत जराशी
आता बरसणे थांब जरा
अश्रू डोळ्यातून बरसती ।
ऊध्वस्त झालीत घरेदारे
ऊध्वस्त झालीत स्वप्ने
ना राहण्यास घर राहिले
ना खाण्यास अन्न ऊरले ।
होते जाणीव पदोपदी आता
नाही निसर्गाची अवकृपा
वृक्षतोडीचा अतीरेक झाला
यात निसर्गाची ना गलती ।
येऊ दे आतातरी जाग मानवा
थांबावा हस्तक्षेप अतीरेकी
सुधारणेच्या नावाखाली आता
ना उजाड व्हावी ही धरती ।

सुरेश काळे
सातारा.
मो. 9860307752
२५ ऑगस्ट २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..