आखून देतो निसर्ग सदा,
मार्ग जीवनाचे ।
त्या वाटेवरी चालत रहा,
आवाहन त्याचे ।।१।।
चालत राहती जे जे कुणी,
त्यावरी विसंबूनी ।
यशस्वी होती तेच जीवनी,
समाधान लाभूनी ।।२।।
कर्ता समजूनी काही काही,
अहंकारी होती ।
सुख- दु:खाच्या चक्रामध्ये,
तेच सापडती ।।३।।
भटकत जाती भिन्न मार्ग,
काही कळापरि ।
परिस्थितीचे चटके बसता,
येती वाटेवरी ।।४।।
हिशोबातील तफावत ही,
दु:खाचे कारण ।
नजीक जाता आखल्या मार्गी,
सुखी होई जीवन ।।५।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply