निसर्गाचे
ऋतू सहा
हे सोहळे
आता पहा
वसंतात
हा बहर
सृष्टी फुले
ही लहर
ग्रीष्म ऋतू
त्रासदाई
दाहकता
फार बाई
गेला ग्रीष्म
वर्षा आली
ही अवनी
पाचू ल्याली
पानगळ
शरदात
मजा येई
चांदण्यात
थंडी पडे
हेमंतात
उब मिळे
शेकोटीत
हा गारठा
असह्य ही
शिशिराची
वाट पाही
ऋतूचक्र
फिरते हे
आवडीचे
सर्वांचे हे
सौ.माणिक (रुबी)
Leave a Reply