कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी
उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी १
तुझ्या मोरानें दाखविले नृत्य
राघूच्या वाणीनें शिकविले सत्य २
कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी
चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि ३
मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला
कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला ४
घारीची भरारी स्वछंद केले मनां
मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा ५
विजेची चपळता चंचल बनवी
धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी ६
निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान
करी त्यास मदत आनंदी होण्या जीवन ७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply