मह्या शेतातं जोंधळं,
डोले डौलं वार्यावरं
पानं हिरवे वल्लेचिंब,
सळसळती तालातं…!!!
वारं गाई गाणं छानं,
घुमे शिळं कपार्यांत,
कणीस डोकाऊनं पाहते,
धुंडते शिळकर्यालं..!!!
पानावर पानं सात,
पानं बसले चोपून
जसं नववारी लुगडं,
नेसलं नटुनं थटुनं.!!!
दानं भरती कनसातं,
मोती पवळंयाची आरासं
लपत येई चिमना चोरं,
नेई दानं पळवुनं…!!!
फुलपाखराच्या संगतीनं,
फुलं पहाती लपुन,
मध्ये लुडबुडे सुगरनं,
खोपा सांधत सांधत़…!!!
भरली निसर्गाची शाळा,
पक्षी किटकांचा मेळं
झाडं बसले रांगेतं
रंगला सृष्टीचा खेळं….!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply