निष्कांचन ठरती वेडे
वेडे असती कांचन हाती
निर्धन जपती माणूस ठेवा
धनाढ्य जपती माणूस मेवा
माणूस म्हणूनी जन्म मिळाला
पण कांचन मृगजळी घेऊनि गेला
होत्या नव्हत्या जवळीकतेचा
उपाय सांगा काय झालं…..
अर्थ:
निष्कांचन ठरती वेडे, वेडे असती कांचन हाती
(हौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात.)
निर्धन जपती माणूस ठेवा, धनाढ्य जपती माणूस मेवा
(ज्यांच्याकडे संपत्ती नाही अशी माणसं माणुसकीचा दागिना घालून या जगात ताठ मानेने जगतात, तर ज्यांच्या कडे अफाट संपत्ती आहे असा माणूस त्या संपत्तीच्या पुढे अनेक चुकीची कामे सामान्य माणसाकडून करवून घेतो.)
माणूस म्हणूनी जन्म मिळाला, पण कांचन मृगजळी घेऊनि गेला
(जन्म जरी मनुष्याचा मिळाला तरी ऐपत माणसाला झेपत नाही आणि त्यामुळे संपत्ती कमावण्यासाठी सीमा ओलांडल्या जातातच.)
होत्या नव्हत्या जवळीकतेचा, उपाय सांगा काय झालं.
(संपत्तीच्या लोभापायी जवळची माणसं लांब जातात तर लांब असलेली जवळीक करतात पण ती सुद्धा केवळ स्वार्थापायी. त्यातून निष्पन्न काय होणार याचा विचार कोण करणार?)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply