अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार ।
कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार ।।
खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी ।
वादळ वारा ऋतू बदले, चूक न होई त्यांत जराशी ।।
घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत ।
हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत ।।
प्रत्येक कालक्रमणाच्या आखून, दिल्या मर्यादा ।
ठेवी अडकवून त्यामध्ये, सर्वाना नियती सदा ।।
जरी भासे नवीन कुणा, नाविन्य सारे त्याचेसाठी ।
बघत नाही जूनेपण तो, येई नंतर त्याचे पाठी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply