लाइफ सेव्हिंग फाउंडेशन आणि र नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्यातर्फे ने येत्या रविवारी (१२ डिसेंबर) दिवसभरासाठी पुण्यात ‘नो हाँकिंग डे’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी नऊ वाजता शहरातील १० चौकांमध्ये एकाच वेळी या उपक्रमाला सुरुवात होईल.
‘पुण्यात दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर दररोज दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत असतात.
कारण नसेल, तर हॉर्न वाजू नका,’ नसेल, तर हॉर्न वाजू नका,’ हा संदेश उपक्रमातून देणार आहोत. कोथरूड, विश्रांतवाडी, पाषाण, बाणेर आणि जंगली महाराज रस्ता या भागात जनजागृती करणार आहोत. आय टी कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी, विविध सामाजिक संघटना, सोसायट्यांना उपक्रमात सहभागी होण्याचे आम्ही आवाहन केले आहे, असे पाठक यांनी सांगितले.
रस्त्यावरील गोंगाटामुळे नागरिकांना उच्च रक्तदाब, हृदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा सामना करावा लागत आहे. शाळा, हॉस्पिटलच्या आवारात ‘नो हॉर्न’चे जनजागृतीपर फलक दिसतात; पण आपण त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. या उपक्रमातून आम्ही विनाकारण वाजवल्या जाणाऱ्या हॉर्नबद्दल जनजागृती करणार आहोत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मकरंद टिल्लू, नवचैतन्य हास्ययोग परिवार
पुणे.
Leave a Reply