नवीन लेखन...

‘नोबेल’चे अज्ञात मानकरी

एखाद्याला पडलेल्या प्रश्नातून किंवा सुचलेल्या कल्पनेतूनच शोध लागतात. आजच्या काळात जसे आपल्या विविध गरजा किंवा समस्या शास्त्रज्ञांना नवनवी तंत्रे विकसित करायला भाग पडतात, तशाच गरजांमधून खरेतर लाखो वर्षांपूर्वी आदिमानवांनीही शोध लावण्यास सुरुवात केली.

या शोधांमुळेच माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा ठरू लागला. मात्र, ते शोध लावणारे त्या काळचे शास्त्रज्ञ कोण होते हे आपल्याला कधीच समजू शकणार नाही.

या अज्ञात शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांमध्ये दगडी हत्यारांची निर्मिती, विस्तव पेटवणे, प्राण्यांच्या हाडांपासून हत्यारे तयार करणे, सुईृ-दोरा, लोकरीचा वापर, धनुष्य-बाण आणि पुढे चाक, मातीची भांडी, जमिनीतून धातू काढण्याची कला, कापड, घर बांधण्याची कला आणि शेतीचा समावेश होतो.

आज आपण म्हणू हे कसले शोध? पण प्राण्याप्रमाणे जगणाऱ्या माणसाने या गोष्टींचा वापर सुरू केला आणि त्याचे आयुष्य बदलत गेले. त्याकाळी आदिमानवांना हे शोध लागले नसते तर आजही माणूस त्याच्या पूर्वीच्याच अवस्थेत एखाद्या प्राण्याप्रमाणे जगत असता.

हे शोध लागण्यासाठी कारणीभूत ठरली माणसाची निरीक्षणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता. निसर्गात घडणाऱ्या विविध घटनांचे किंवा घटकांचे निरीक्षण करताना त्याला त्या घटकांचे गुणधर्म लक्षात आले.

दगडाचा कठीणपणा प्राण्याला मारण्यासाठी किंवा एखादे कठीण फळ फोडण्यासाठी होतो हे जसे त्याच्या लक्षात आले, तसेच ठराविक प्रकारचे दोन दगड एकमेकांवर घासल्यास त्यातून ठिणग्या उडतात, हेही त्याच्या नजरेतून सुटले नाही.

उंचावरून घरंगळत येणाऱ्या ओंडक्यातून त्याला चाकाची कल्पना सुचली, तर वनस्पतींचे बी जमिनीत पेरल्यास त्यातून पुन्हा वनस्पती उगवते हे त्याला निरीक्षणातून समजले. यातूनच शेतीचा शोध लागला आणि माणसाची शिकारीसाठीची किंवा शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली.

हे कशामुळे घडले? निसर्गातील घटकांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म माणसाला समजले, तसेच निसर्गात घडणाऱ्या घटनांच्या मागील नियम त्याच्या लक्षात आले आणि त्यांचा वापर त्याने आपल्या गरजेप्रमाणे करून घेतला. आदिमानवच काय आजच्या काळातील अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ तेच करतात.

अशाच शोधांसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते. त्याकाळी नोबेल सारखे पारितोषिक असते तर हे अज्ञात शास्त्रज्ञ नक्की त्याचे मानकरी ठरले असते.

2 Comments on ‘नोबेल’चे अज्ञात मानकरी

  1. मस्त लेख आहे. अजुन सविस्तर असता तर अधिकच छान वाटला असता.

  2. मस्त लेख आहे. केलेली कल्पनासुद्धा खुप छान आहे. लेख थोडा अजुन सविस्तर आणि मोठा असता तर अजुन मजा आली असती.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..