१९१२ मध्ये नोबेलचा शांती पुरस्कार देण्यासाठी जगातील एकूण १३० मान्यवरांची नावे सूचविण्यात आली होती. मात्र या सर्वांमधून स्वीडिश अकादमीने रिगोबर्टा मेन्यू या अहिंसावादी कार्यकर्तीची निवड केली.
‘ या हिंसाचारी दुनियेत रिगोबर्टा मेन्यूने अहिंसेचे शस्त्र वापरून सुरू केलेली मानवतेची लढाई आम्हाला अधिक प्रेरणादायी वाटली. म्हणून सत्यासाठी सकेलेल्या तिच्या या शांती कार्यासाठी आम्ही हा नोबेल पुरस्कार बहाल करीत आहोत, ‘ असे स्वीडिश अकादमीने त्या वेळी हा पुरस्कार देताना जाहीर केले होते आणि ते खरेच होते. असंख्य अत्याचार सोसूनही रिगोबर्त मेलूने न डगमगता आपली अहिंसावादी चळवळ चालूच ठेवून असंख्य लोकांना न्याय मिळवून दिला होता.
रिगोबर्टा मेन्यू ही ग्वालेमाटामधील निर्वासित भारतीयांच्या समूहांपैकी एका समूहातील होती. तिचे वडील विसेळे मेन्यू एक कम्युनिस्ट नेते होते त्यांना एकूण नऊ मुले होही. त्यातील रिगोबर्टा ही सर्वात छोटी मुलगी.
तिचा जन्म १९५९ मध्ये चिमेल या गावी झाला. रिगोबर्टाचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत केले, वयाच्या आठव्या वर्षापासून तिला आपल्या आईबरोबर कॉफीच्या मळ्यात मजूर म्हणून काम करावे लागले. तेथे मजुरांवर मळे मालकांकडून होणारे अत्याचार तिने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. तिचा मोठा भाऊ फिलीपचा कॉफीवरील कीटकनाशक रसायनामुळे मृलू झाला तर धाकटा भाऊ निकोलस कुपोषणामुळे बळी गेला. या घटनेचा रिगोबर्टाच्या कोवळ्या मनावर खूपच परिणाम झाला. पुढे तिला स्वतःलाही अशाच अनेक वाईट अनुभवातून जावे लागले.
केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी अन्याय सहन करणाऱ्या अशा अनेक मजुरांना एकत्र करून रिगोबर्टाने त्यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले. अर्थात हे आक्षेलन अहिंसक होतेत्यामुळे प्रारंभी ते दडपून टाकण्यासाठी मजुरांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यातून रिगोबटही सुटली नाही. मात्र जिवावर उदार होऊन रिगोबर्टाने आपला लढा चालूच ठेवला व त्यात ती अखेर यशस्वी झाली.
तिच्या या शांतिकार्यालाच नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या वडिलांच्या नावाने फाउंडेशन स्थापन करून तिने पुरस्काराची सर्व रक्कम मानवतावादी कार्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.
Leave a Reply