नवीन लेखन...

नोटा छापण्याची मशिन 

धन म्हणजे पैसा, पैसा म्हणजेचं धन… आपला सर्व डोलारा तन मन धन यावरचं अवलंबून आहे… पण पैसा हा तन मनाचा मारक ही आहे… म्हणूनच काहि जनाचें बाबतीत पैस सर्व काहि नाही… पण जवळपास ७०/८० लोकांन साठी पैसा हा सर्व काहि आहे..

या ७०/८० टक्के लोकांन मधील काहि जनाना ऐवढी हाव असते की रिटायर्ड झाल्यावर ही मरमर करतात… लेकरांची काळजी पोटी की मेल्यावर सोबत नेण्यासाठी काहि काहि समजतं नाही… सोबत तर नेऊ शकत नाहीत, ऊलट लेकरांना ही पैस्याची किंमत कळू देत नाहीत… हरामाचा पैसा जमा करणारांची गोष्ट तर वेगळीच आहे, स्वत:ही धड जगतं नाहीत, बिपी शुगरचे धनी होतात, जेल मध्ये जातात, वरुन हसतात अंदरुन रडतात… अन हे लेकरांना ही असंस्कृत बनतात पशुत्व त्यांच्यात निर्माण करतात… पैस्याची किंमत कळत नाही अथवा गरिबीची अनुभूती अंतकरणात घुसत नाही तो पर्यन्त काहि खर नाही… बघा साध्या झेडपी मेंबरचा पोर्या कश्या गोष्टी करतो… राजकारण म्हणजे ” नोटा छापण्याची मशिनचं “…..

नोटा छापणारांन मधील काही काही ” पुणे लुटतात सातार्याला दान करतात ” दानशूर पणा दाखवता… असचं वर्तन सरकारचं पण आहे… करदात्याचा पैसावरच परस्पर फुकट्या योजना राबवत आहे… शासन अस तसं भल्यामोठ्या जाहिराती लावून टेंभा मिरवते…

सरकारच्या फुकट्या योजना, फुकट्यांना वरदान आहे पण सामान्य मध्यमवर्गीय लोकांना शाप आहे… सरकाने मध्यमवर्गिय लोकांचं मरणाचं नियोजन केलं, असचं म्हणाव लागेलं… सामान्य माणूस मध्यम वर्गीय माणूस परेशान… किरकोळ काम दुरुस्तीचे असो की किरकोळ नविन काम असो, काम करणाराला आवश्यकता नाही आपली, जरुरत आहे त्यांची आपणाला… मध्यम वर्गीय गरजवंत माणसाला… नाही केल काम, नाही मिळाला पैसा काही काही अडत नाही त्यांच ऊपासी राहतच नाही, पहिलेच सरकारने व्यवस्था केलेली आहे, त्यांच्या घरात धान्य भरुन ठेवण्याची… अडत आपल काम, खोळंबतं आपल काम… ” अडला नारायण गाढवाचे पाय धरी “… असी गत होते आपली, ४०-५० रुपयाचे कामासाठी ५००-१००० रुपये मोजावे लागतात… प्लबंरचं प्लबंर डाॅक्टरची बरोबरी करतो नळाला हात लावण्याचे ५०० रुपये घेतो…

बट्याबोळ केला ह्या फुकट्या योजनांनी, बजेट कडमडलं , कबंरड मोडलं मध्यमवर्गिय माणसांचं, रोजगार हमी योजनेन तर सत्यानास केला… शेतकरी आत्महत्या करायला रो.ह.यो.च अस माझ ठाम मत आहे… रो.ह.यो.चा मला चांगला अनुभव आहे… शेतकरी परेशान शेतकर्यांचं ही मध्यमवर्गिय माणसा सारखचं… निंदन असो, डवरे असो, कापूस वेचणी असो की सोयाबिन काढणं, फवारणी साठी ही अव्वाच्या सव्वा मजूरी ….

दारु पिवून मेल्या नंतर ही, बेवड्याचा संसार मोडकळीस येत नाही, ऊलट तो बहरतो फुलतो, हे कश्याचं लक्षण… फुकट्यांना हिरवा हिरवा चारा ! सामान्यानां पाणी लावून मारा !… परिणामी देशभक्त निर्मितेला खिळ बसली… देश गेला चुलीत, जो फुकट देईल त्याला वोट, मग तेच राजकर्ते जनतेच्या ऊरावर बसून राज्य करतात… सध्यातर नंगा नाच चालू आहे, जेल भोगून आलेला घोटाळेबाज धुमाकुळ घालतं आहे… घोटाळेबाज भ्रष्टाचारी यांचाच आदर्श घेवून नविन पिढी घडत आहे, घडलेली आहे… नौकरीवर लागणाराचा असा समज आहे, नौकरी म्हणजे ” नोटा छापण्याची मशिनचं “… मगं काय पगार बचत… वरच्यावर खुळनं ! गरजवंत परेशान ! नौकरीवर लागला की… एका वर्षातचं बुडाखाली गाडी… परिणामी सौदेबाजी, लग्नात रुसनं फुगणं…

पैसेवाल्यांनचे काळजात गरिबीची अनुभूती घुसत नाही… गरिबीचा अनुभूव घेलेला साहेब गरिबाची कदर करीत नाही… एक रुपयाला आज किंमत नाही म्हणतात… फकिर ही एक रुपया स्विकारत नाही… मग हा एक रुपया येतो कुठून…. आभाळातून पडत नाही, किंवा जमिनीतं उगवतं नाही… तो निर्माण होतो घामातून आपली प्राण उर्जा खर्च करुन, आपला मेन्दू झिजवून… झिजझिज झिजतो मनुष्य तेव्हा पैसा मिळतो… याची कदर नसते या हरामखोरांना… भ्रष्टाचार करतात, हुन्डा मागतात, याची लाज नाही वाटतं साल्यांना… अस कोणीचं म्हणतं नाही…

” नको फुकटाचे काही “
देविदास गिरे – अकोला
दि. २३ डिसेंबर २०२३

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..