निरागस हास्याच्या, अप्रतिम तरीही साध्या सौंदर्याच्या, आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटसृष्टी परिपूर्ण म्हणून नूतनजी ओळखल्या जात. त्यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी झाला. नूतन यांचे माहेरचे नाव नूतन समर्थ, सासरचे नाव नूतन बेहल. मिलन चित्रपटातलं ‘सावन का महिना’, सरस्वती चंद्र चित्रपटातलं ‘चंदन सा बदन’ , कर्मा चित्रपटातलं ‘दिल दिया है जान भी देंगे’ सुजाता मधलं “जलते है जिस के लिये”, बंदिनी मधलं “मेरे साजन है उस पार” आणि दिल ही तो है मधलं “तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही” ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी…व त्यातलं नूतन यांचे ते साधं तरीही सुंदर दिसण…
गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतनला जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी ते सौदागर अशा अनेक सिनेमातील यादगार भूमिका करून गेल्या. नूतन यांचा आवाज चांगला होता; आणि स्वत:ची गाणी स्वत: गावीत असे त्यांना मनापासून वाटायचे॰ त्याच्या आईने निर्माण केलेल्या ” छबिली ” या चित्रपटात इच्छा पूर्ण झाली॰ त्याची त्यातील दोन गाणी बरीच लोकप्रिय झाली; त्यामुळेच त्यांनी सुभाष देसाई या निर्मात्याच्या मागे लागून त्याच्या ती नायिकेची भूमिका करत असलेल्या ” छलिया ” चित्रपटातील गाणी आग्रहाने, हट्ट करून गायली॰ नूतन १९५१ साली ‘ मिस इंडिया ‘ या किताबाची मानकरी ठरली होत्या॰ १९७४ मध्ये केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री ‘ पुरस्कार प्रदान केला. नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply