कुठे तु गेलीस न्याय देवते,
जगास सोडूनी याच क्षणी ।
अन्यायाची कशी मिळेल मग,
दाद आम्हाला या जीवनी ।। १ ।।
परिस्थितीचे पडता फेरे,
गोंधळूनी गेलीस आज खरी ।
उघड्या नजरे बघत होती,
सत्य लपवितो कुणीतरी ।।२।।
दबाव येता चोहबाजूनी,
मुस्कटदाबी होती कशी ।
शब्दांना परि ध्वनी न मिळता,
मनी विरताती, येती जशी ।।३।।
बळी कुणाच्या पडली तू गे,
मार्ग रोखीले तुझे कसे ते ।
अपयश येता सत्यालाही,
म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’ ।।४।।
आज न आले यश जरी,
न्याय येईल उफाळूनी ।
अंतिम विजय हा सत्याचा,
जाणीव आहे ह्याची मनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply