नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ९ – शुष्क पठारा वरील जंगलातील बहुउपयोगी वृक्ष – बाभूळ

बाभूळ हा वेडावाकडा, अनाकर्षक, काटेरी व ओबडधोबड वृक्ष असल्यामुळे सामान्य लोकांमद्धे प्रिय नाही. परंतु हा लेख शेवट पर्यंत वाचल्यास आपला हा भ्रम दूर होईल अशी आशा आहे.
अशा ह्या वृक्षाबद्दलची माहिती.


कुठेही, कसेही उगवणारे बाभूळ हे झाड म्हणजे ह्या उक्ती चे ज्वलंत उदाहरण आहे. संस्कृत मध्ये ह्याला दीर्घकंटका, हिंदीत बबूल आणि इंग्लीश मध्ये Acacia असे म्हणतात. बाभळीची अन्य नावे : बब्बूळ, बब्बूल, बर्बुर (संस्कृत), कीकर, बाबुल (हिंदी), बावळ (गुजराथी), शमीरूकु (कोंकणी), कुरूवेलम (मल्याळम), करूवेल (तेलुगू) वगैरे

हे झाड वनस्पती जाती मध्ये मिमोसी ह्या कुळात मोडते. बाभूळ हे झुडूप किंवा हा लहान वृक्ष फॅबेसी कुलाच्या मिमोजॉइडी उपकुलातील आहे. त्याचे शास्त्रीय नाव ॲकेशिया निलोटिका आहे. बाभूळ हे रेताड जमिनीत उगवणारे झाड आहे. त्याला समशीतोष्ण हवामान, कोरडी हवा, १५-२८ डिग्री सेल्सियस आणि २५० – १५०० मी.मी. वार्षिक पाऊस पुरतो. दुष्काळी किंवा कमी पावसाने बाष्पीभवन फार होऊ नये म्हणून याची पाने काट्या मध्ये रूपांतरित होतात. बाभूळ हा काटेरी वृक्ष ५–२० मी. उंच वाढतो. तो अतिशय कणखर असतो. खोडाची साल गडद तपकिरी किंवा जवळपास काळी, जाड व टणक असून कमी-अधिक भेगाळलेली असते. या वृक्षाला अनेक शाखा फुटलेल्या असतात. पाने संयुक्त व एकाआड एक असून ती अनेक लहान पर्णिकांची बनलेली असतात. प्रत्येक पानाच्या तळाला दोन, १–५ सेंमी. लांबीचे, पांढरट, अतिशय टोकदार, तळाशी पोकळ व टोकाशी कठीण, टोकदार काटे असतात. पावसाळ्यात या वनस्पतीला असंख्य, लहानलहान, पिवळे व गोटीसारखे फुलोरे येतात आणि झाड फुलांनी बहरून जाते. प्रत्येक फुलोऱ्यात १०–२० सूक्ष्म फुले असतात. फुले येण्याचा हंगाम हिवाळ्यातही चालू राहतो. हिवाळ्यात शेंगा धरतात.

बाभूळ सर्व भारतात कुठेही उगवतो. तो लावावा लागत नाही. हे झाड ‘झुडूप’ या वर्गामध्ये येते. म्हणून ते मध्यम उंचीचे असते. पण फांद्या आणि पानांचा पसारा खूप वाढतो.

बाभळीची विशिष्ट पाने लहान बारीक वाटलेल्या पानांचे रूप धारण करतात जे पानांच्या दांड्याला पंख किंवा फर्नसारखे दिसतात. हे पानांचे कार्य करतात. पाने हे ढिगासारखे ही असू शकतात. बाभूळ त्यांच्या लहान, अनेकदा सुवासिक फुलांद्वारे देखील ओळखले जातात, जे गोलाकार किंवा दंडगोलाकार क्लस्टर्स मध्ये व्यवस्थित असतात.

बाबुल वृक्षाला खूप फाट्या फुटलेल्या असतात. या वृक्षाची पाने संयुक्त आणि एक आड एक असून ती आनेक लहान पर्णीकांची‌ बनवलेली असतात. पावसाळ्यामध्ये या वनस्पतीला असंख्य पिवळ्या रंगाची फुले येतात. या वृक्षाला फुले येण्याचा हंगाम हिवाळ्यामध्ये चालू होतो. फुलोरा मध्ये दहा ते वीस अशाप्रकारे पिवळ्या रंगाची फुले येतात. तसेच बाभूळ वृक्षाला हिवाळ्यामध्ये चा शेंगा धरतात आणि त्या उन्हाळ्यापर्यंत झाडावर दिसतात.

बाभूळ वृक्षाच्या शेंगा पांढरट, पिवळसर आणि माळे सारखी शेंग येते व त्या शेंगेच्या आत मध्ये दहा ते बारा अगदी लहान व चपट्या बिया असतात. बियांपासून रोपे सहज येत असल्याने या झाडाची लागवड केली जात नाही, ही झाडे कुठेही सहजरित्या उगवतात.

बाभूळ वृक्षाच्या जाती:
बाबुल वृक्षाच्या मुख्यता दोन जाती आढळतात. भारतामध्ये सर्वत्र या दोन्ही जातीचे बाभूळ वृक्ष आढळते.
1 गावठी बाभूळ

2. देव बाभूळ

सन ८० च्या दशकांमद्धे यात अजून दोन जातींची भर पडली. ती म्हणजे सुबाभूळ व ऑस्ट्रेलियन बाभूळ. परंतु कालांतराने त्यांचे पर्यावरणीय दुष्परिणाम दिसून आल्यावर त्यांची लागवड बंद केली गेली.

बाभूळ वृक्षाचे उपयोग:

बाभूळ हा वृक्ष भारतामध्ये असंख्य संख्येने आढळतो. तसेच याचे बरेचसे उपयोग आपल्याला होतात.

बाभूळ ही भारतातील सर्वांत महत्त्वाच्या व उपयुक्त वनस्पतींपैकी एक आहे. तिचे अनेक उपयोग आहेत. या वृक्षाचे लाकूड खूप कठीण आणि टिकाऊ असते.

१. त्यापासून अवजारांच्या मुठी व नावेच्या वल्ही तयार करतात. जळाऊ लाकूड म्हणून ते उपयुक्त असते. सालीचा आणि शेंगांचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, काळा रंग आणि शाई बनविण्यासाठी होतो. यापासून फर्निचर, बांधकाम करण्यासाठी लागणारे फळ्या, विविध अवजारे बनवण्यासाठी वापरतात.

२. भारतात आणि आफ्रिकेच्या दक्षिण भागात बाभळीच्या कोवळ्या फांद्या दात घासायला वापरतात; त्यामुळे हिरड्या आणि दात बळकट होतात. कोवळा पाला व शेंगा शेळ्या मेंढ्यांना चारा म्हणून देतात.

३. बाभूळ वृक्षा मध्ये टॅनिन नावाचे द्रव्य असते. हे द्रव्य वापरून रोग प्रतिबंध औषधे तयार केली जातात.

४. भारतामध्ये आढळणाऱ्या जाणाऱ्या बाभळीचा डिंक हा औषधी गुणधर्मामध्ये तसेच चिटकवण्यासाठी गोंद म्हणून वापरला जातो. तसेच थंडीमध्ये बदामा सोबत खाण्यासाठी सुद्धा हा डिंक उपयोगी पडतो. तो पौष्टिक असून डिंकाचे लाडू करण्यासाठीही वापरला जातो. या झाडाच्या खोडातून निघणारा पिवळसर रंगाचा डिंक अनेक औषधी गुणधर्म मध्ये वापरला जातो. बाभूळच्या डिंका मध्ये 52 टक्के कॅल्शिअम आणि 20 टक्के मॅग्नेशियमचे प्रमाण असते. त्यामुळे हा डिंक आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. साल, पाने, फुले, शेंगा आणि खोड यांपासून मिळणारे डिंक औषधी आहेत.

५. अतिरक्त सार, मासिक पाळी यावर उपाय म्हणून बाभळीचा डिंक वापरला जातो.

६. तसेच बाभळीचे फुले, पाने आणि फांद्या यांचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. टूथपेस्ट मध्ये सुद्धा बाबळी चा उपयोग होतो. दात निरोगी व घट्ट हिरड्यांसाठी बियांचे चूर्ण वापरतात. सद्ध्या भारतीय आयुर्वेदिक व नामवंत परदेशी कंपन्याच्या टूथपेस्ट मद्धे बाभुळची पेस्ट व पावडरचा खूप मोठा वाटा आहे.

७. तो वृक्ष नसतो तेव्हा त्याला वेडी बाभळ म्हणतात. घरांना-शेतांना वेड्या बाभळीच्या काटेरी झुडपांचे कुंपण घालतात.

बाभळीचे आयुर्वेदिक आरोग्य फायदे:

हे झाड मुळातच औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. खालील संस्कृत श्लोक वाचला तरी त्याच्या औषधी गुणांची कल्पना येते.

‘बब्बुलस्तुवर: शीत: कुष्ठकासामयापह:l आमरक्तातिसारघ्न पित्ताशरेदाहनाशन्: ll
बब्बुलस्य फलं रूक्षं विषदं स्तम्भनं गुरूl बब्बुलस्य तु निर्यासीग्राही पित्तानिलापह: ll
रक्तातिसारपित्तास्त्र मेह प्रदरनाशन:l भग्नसंधानक: शीत: शोणितस्त्रुतिवारण: ll (द्र. गु.वि. पृष्ट १८७)

या वृक्षाचे डिंक सोडल्यास सर्व भाग तुरट असतात.

डोळा दुखणे: मऊ कोमल पाने बारीक करून अर्कचे 1-2 थेंब डोळ्यात टाका. हे डोळ्यांना सूज आणि डोळ्यांच्या दुखण्यावर उपचार करते.

दातदुखी: त्याच्या शेंगा आणि बदामाची साल जाळून टाका. राख वापरून दात घासा. हे दातदुखीवर प्रभावीपणे उपचार करते. दात घासण्यासाठी मऊ फांद्या वापरा. हे दात मजबूत करते आणि सर्व प्रकारचे दात संक्रमण बरे करते.

कावीळ: त्याच्या फुलांच्या पावडरचे प्रमाण साखर कँडीमध्ये मिसळा. ही पावडर रुग्णाला तीन वेळा दिवसातून 10 ग्रॅम द्या. हे कावीळला बरे होण्यास गती देते.

पोटाशी संबंधित समस्या: त्याच्या आतील झाडाचा एक डेकोक्शन तयार करा आणि 1-2 ग्रॅम द्या. ताकासह. हे सर्व प्रकारचे उदर विकार दूर करते.

घशातील समस्या: त्याची पाने, साल आणि बबूल झाडाची साल समान प्रमाणात घ्या. त्यांना एका ग्लास पाण्यात भिजवा. गार्गल करण्यासाठी हा उपाय वापरा. यामुळे घशाच्या समस्या दूर होतात.

एक्जिमा: बाभळीच्या झाडाची फुले, व्हिनेगरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. हे प्रभावित भागात लागू करा. एक्झामा बरा करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

गर्भधारणा: 2-4 ग्रॅम द्या. त्याच्या पानांची पावडर, दररोज सकाळी. हे गर्भधारणेसाठी मदत करते. गर्भधारणेदरम्यान, ती स्त्रीला दिली पाहिजे. हे शारीरिक शक्ती सुधारते.

जास्त घाम येणे कमी करा: त्याची पाने आणि तरुण हरद समान प्रमाणात बारीक करा. या पावडरने शरीराची मालिश करा आणि थोड्या वेळाने आंघोळ करा. याचा नियमित वापर केल्याने घामावर नियंत्रण येते.

लुंबागोमध्ये उपयुक्त: त्याची साल, शेंगा आणि डिंक समान प्रमाणात घ्या. पावडर तयार करण्यासाठी त्या सर्वांना बारीक करा. या पावडरचे एक चमचे दिवसातून तीन वेळा द्या. यामुळे कंबरेच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

मेट्रोरेजिया: बबूलचे डिंक आणि गहू समान प्रमाणात घ्या. त्यांना बारीक करा आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 चमचे ही पावडर घ्या. हे मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव नियंत्रित करते.

लैंगिक विकार: शेंगा सुकवल्या आणि दळल्या. त्यांना साखर कँडीच्या समान प्रमाणात मिसळा. या पावडरचे 1 चमचे दररोज सकाळी आणि संध्याकाळी ताजे पाण्याने द्या. हे वीर्य जाड करते आणि लैंगिक अवयव आणि कार्यप्रणालीशी संबंधित सर्व समस्या दूर करते.

जखमा: बाबूलची काही कोवळी पाने घ्या आणि त्याची पावडर करा आणि ही पावडर जखमांवर लवकर बरे होण्यासाठी शिंपडा.

फ्रॅक्चर: फ्रॅक्चर बरे करण्यासाठी, बाबूलच्या फळांची पावडर घ्या, मधात मिसळा आणि तीन दिवस घ्या.

बाळाचा रंग: गर्भधारणेदरम्यान बाबूलची पाने चघळल्याने स्त्रीला स्पष्ट, चमकदार रंगासह बाळ जन्माला येते.

त्वचा विकार: खेडीरा प्रमाणेच, बाबूलच्या झाडाची साल देखील पेय, आंघोळीचे पाणी आणि घडे धुण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे जळजळ कमी करते, त्वचेला सामान्य रंग पुनर्संचयित करते आणि अल्सर आणि जखमा लवकर बरे करते.

भूक न लागणे: खारट मीठ मिसळून त्याच्या मऊ शेंगाचे लोणचे तयार करा. हे चव सुधारते.

श्लेष्म अतिसार: ७ ते ९ पाने घ्या आणि ते थोड्या प्रमाणात जिरे आणि भाजलेले जिरे सह बारीक करा. हे मिश्रण 5 ग्रॅम रात्री तोंडी द्या.

रक्ताचा पेच आणि अतिसार: त्याच्या पानांचा 1 चमचा रस घ्या आणि रुग्णाला मधा सह, दिवसातून 1-2 वेळा द्या.
हे गर्भाशयाची सूज कमी करण्यास मदत करते. खोड, झाडाची साल आणि शेंगा आतड्यांमधील किड्यांविरूद्ध कार्य करतात आणि रक्ताच्या जमावात मदत करतात.

स्र्वणाऱ्या एक्झिमावर: झाडाची साल पेस्ट केली जाते. वाळलेल्या पानांची पावडर रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी ताज्या जखमांवर पसरली आहे.

रेक्टल प्रोलॅप्सच्या बाबतीत: रुग्णाला भारतीय बाबूलच्या झाडापासून तयार केलेल्या डिकोक्शनवर सिट्झ बाथ करण्याची शिफारस केली जाते.

झाडाच्या साल पासून तयार केलेला डेकोक्शन तोंडाचे व्रण आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या आजारांमध्ये गुळण्या करण्यासाठी वापरला जातो.

रोपाच्या पानांची पेस्ट जखमेवर आणि आगीच्या संपर्कामुळे झालेल्या दुखापतीवर लावली जाते. डायरियावर उपचार करण्यासाठी आणि आतड्यांमधील किड्यांवर उपचार करण्यासाठी वनस्पतीचा डीकोक्शन 40-50 मिलीच्या डोसमध्ये दिला जातो.

हे पोटदुखी आणि वेदना साठी वापरले जाते. स्कर्वीपासून बचाव करण्यासाठी झाडाची साल चावली जाते.

खूप घाम येत असल्यास बाळज्ञरडा व बाभळीची पाने सममात्रा मध्ये वाटून अंगाला लेप लावून आंघोळ केल्यास घाम येत नाही.

बाभळीच्या कोवळ्या शेंगा मध्ये सैंधव मिठ घालून त्यांचा लोणचे करून रोजच्या आहारामध्ये हा लोणचा खाल्ल्यास अरुची, भूक न लागणे, जठराग्नी अशा समस्येतून मुक्तता मिळते.

यौन संक्रमित आजारांवर बाभळीचे दहा पाने, चमचाभर साखर, 2 काळा मिरी, पाच-सहा डाळींबाची पाने एकत्र करून वाटून ते पाणी पिल्यास यौन संबंधित सर्व समस्या दूर होतात.

अंग दुखी, मान दुखी, पाठ दुखी अशा समस्या असतील तर बाभळीचे साल, शेंगा, डिंक सम मात्रेत वाटून त्यामध्ये शेवगा पावडर मिक्स करून हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस एक चमचा सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.

बाभूळ वृक्ष व पर्यावरण:

बाभळाचे झाड अनेक पक्षी आणि प्राण्यांसाठी एका वसाहतीची भूमिका निभावते. या झाडावर,विविध प्रकारच्या मुंग्या, मुंगळे, पाच ते सहा प्रकारचे कीटक, रातकिडे, सरडे, खारी अशा प्राण्यांचे ते महत्वाचे वसाहतीचे ठिकाण असते. या झाडाची साल खवल्यांची बनलेली असल्याने अनेक किड्यांचे ज्यांचे पर्यावरणात अनन्यसाधारण महत्व आहे अशा कीटकांचे ते आश्रयस्थान असते. या झाडांच्या सालीच्या खवल्यात ते निर्भयपणे वास्तव्य करतात कारण त्यात त्यांना वारा, ऊन, पाऊस आणि थंडीपासून संरक्षण प्राप्त होते. या झाडाची मुळे खोलवर जात असल्याने त्या मुळांच्या आधाराने अनेक मुंग्यांची बिळे त्यांच्या आश्रयात निर्माण होतात आणि त्यामुळे जमिनीतील खोल भागात हवा खेळती राहण्यास मदत होते. या मुंग्यांना या झाडांचा डिंक खाद्य म्हणून उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर त्यांना अभेद्य असे आश्रयस्थान प्राप्त होते. या झाडावर साधारणपणे चार ते पाच प्रकारच्या मुंग्या आणि मुंगळे यांचे वास्तव्य असते. कांही वेळा सालीच्या पोकळीत विंचू सुद्धा आढळून येतात.

काटेरी वृक्ष असल्यामुळे याला चराऊ जनावरांचा धोका अत्यंत कमी असतो. त्यामुळे यावर एकमेकास पूरक अशी वसाहत तयार होते.

मराठी साहित्यातील बाभूळ वृक्ष:

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे हा वृक्ष जनमानसात अप्रिय आहे. परंतु मराठी कविंच्या मनात हा खूप प्रिय आहे. आता हेच बघाना, प्रत्येक माणसाला केंव्हा ना केंव्हा तरी बाभळीचा काटा रुतलेला असतोच. परंतु शांत शेळके यांनी लिहलेल्या व पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी
गायिलेल्या या गीतात त्याचे बहारदार वर्णन व अन्ययोक्ती आहे.

काटा रुते कुणाला
आक्रंदतात कोणी
मज फुल हि रुतावे
हा दैवयोग आहे.

बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे.

अस्सल लाकूड, भक्कम गाठ,
ताठर कणा, टणक पाठ,
वारा खात, गारा खात, बाभुळ झाड उभेच आहे,’

या ओळीतून दिसतो. त्याचबरोबर आयुष्यभर तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलाने बापाला म्हातारपणी छळावे, तसा सुतार पक्षी बाभळीला छळताना दिसतो. ते लिहितात,

‘खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे,
टक्… टक्… टक्… टक्…, चिटर् फटक्… चिटर फटक्,
सुतारपक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे’.

वसंत बापट सरांना बाभळीच्या झाडामध्ये कणखर बाप दिसत असला तरी बा.सी. मर्ढेकरांसारख्या आधुनिक कवीला मात्र-

‘अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते,’

असे थोडे वेगळे दर्शन होते.

इंदिरा संत यांना बाभूळ झाडाचे नाजूकपण भावते. आपल्या ‘बाभळी’ या कवितेत लवलवत्या हिरव्यागार पालवीवरील काट्यांची जाळी त्यांना मोहवत असल्याचे त्या सांगतात. शेंगांची वेलांटी त्यांना नाजूक वाटते. बाभळीचे एकाकीपण मान्य करतानाच त्या पोपट, शेळ्यांची जवळीकही सांगतात. मात्र या झाडाचा नाजूक कोपरा म्हणजेच फुलणे त्यांनी खूप सुंदर रंगवले आहे. त्या म्हणतात,

येथे येऊन नवेच होऊन, लेऊन हिरवे नाजूक लेणे,
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे.

संदर्भ:
१. मराठी विकिपीडिया
२. Dwivedi, A.P. (1993) babul, (A. nilotika) a multipurpose tree.FRI Dehradun. pp226
३. गणपती सिंग वर्मा (२०१५) बबुल गुण विधान pp ४०२.
४. डॉ. दत्ता पाटील १२ ऑक्टोबर, २०२० लोकमत
५. लोकसत्ता टीम August 10, 2017
६. लोकआरोग्य (Lokarogya) यातील बरेच लेख.
७. ग्रीन रूम ब्लॉग , ९ ऑक्टोबर,
८. गुगल वरील बरेच लेख
९. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

3 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ९ – शुष्क पठारा वरील जंगलातील बहुउपयोगी वृक्ष – बाभूळ

  1. बाभूळ विषयी लेखन अनमोल नाविन्यपूरक माहिती खूपच छान आहे धन्यवाद सर

  2. खूप माहितीपूर्ण व विस्तृत लेख. वाचून सर्वसामान्य ज्ञानात भर पडली.धन्यवाद.

  3. बाभूळ वरील अनेक लेखक आणि कवींचे वर्णन प्रथमच वाचले. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..