१ : ओंकारेश्वर: (२७ मार्च)
इथे आल्याबरोबर आशीर्वाद गेस्ट हाउस”मधे सामान ठेऊन लगेच इथल्या अनेक स्थानीय दर्शनायोग्य ठिकाणांमधील तीन महत्वाची ठिकाण पहायला गेलो.
एक म्हणजे साईबाबांनी सिध्दी दिलेले (मुळचे इंदोर चे ) श्री अनंतानंद साईश ,त्यांचे शिष्य भक्तराज महाराज ह्या जोडी चा आश्रम, दुसरे श्रीराम महाराज ज्यांना श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिक्षा दिली ,ती जोडी,यांचा आश्रम जिथे अखंड “श्रीराम जयराम जयजय राम “हा मंत्र जप सुरु असतो.
तिसरे श्री श्री दादाजी धुनीवाले,(बडे दादाजी व छोटे दादाजी ),ही गुरु शिष्य जोडी यांचा आश्रम आहे.
त्यानंतर लगेच श्री ओंकारेश्वर व ममलेश्वर (ज्योतिर्लिंग) दर्शन करून श्री पु गजानन महाराज यांचे मंदिरात गेलो .तुर्तास दक्षीण,उत्तर तट असे बंधन नव्हते.
दि.२७ ला सकाळी सर्व प्रथम नर्मदेच्या घाटा वर जाऊन स्नान.पाणी नगण्य असल्याने बोटाने मधल्या प्रवाहात जाऊन तिथे स्नान करून घाटावर पंडितजींने सांगितल्या नुसार नर्मदेची पुजा,आरती,जल व दुग्ध अभिषेक,मग यथासांग “परिक्रमा संकल्प “पुजा व कढई चा प्रसाद(शिरा).हे करून हॉटेल ला परत येऊन ५ कुमारिकांची पुजा,त्यांना दान एका सवाष्णीची ओटी वगैरे भरून परिक्रमेचा श्रीगणेश:झाला.अभिषेकाच्या सुरूवातीला आम्ही घाटाच्या ज्या पायरीवर उभे होतो तिथे विषेश पाणी नव्हते,पण जसजसे पुजन चालले होते तेंव्हा अचानक पाणी वाढायला लागले,कारण डैम मधुन पाणी सोडणे सुरु झाले.नेमके त्यांच वेळेला पाणी सोडावे हा योगायोग असु शकतो किंवा ती वेळ गुरूजींना माहीत असेल पण अभिषेक संपेपर्यंत पाय पाण्यात बुडले खरे ! जणू नर्मदा मैया दर्शनासाठी आली ! दुध ,फुल,तांदुळ वगैरे सोडुन आम्ही पाणी प्रदुषीत करून पाप केले,व अभिषेक करुन पुण्य कमावले.एकुण पाप-पुण्याची गोळाबेरीज शुन्य ठेऊन आमचे आगे बढो सुरु .कुमारिका पुजनाच्या वेळी नेमकी एक गाय आली व जेवणापुर्वी गोग्रास देतां आला,व पुंण्य कमाईला सुरवात झाली.मानला तर शुभशकुन म्हणायचा.
जेऊन लगेच “बडवानी “साठी निघालो .वाटेत रावेरखेडी येथेअसलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या समाधीचे व तिथे बांधलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले .जवळच खाली नर्मदेचे विस्तिर्ण पात्र आहे.बाजीरावला एक अय्याशी करणारा म्हणुन इतिहासांत दर्शवले आहे पण तो एक अपराजित योध्दा होता.नर्मदेच्या काठी तळ ठोकला असताना अति उन्हामुळे(संस्ट्रोकड) ऐन तारूण्यात (४० वर्षे)म्रृत्त्यृ झाला. तिथून जवळच एक सियाराम म्हणुन अवलिया(फकिर) वय ९५ + अजुनही चांगले हिंडले फिरते यांचे आश्रमात गेलो .जवळच एक महाराष्ट्रियन महिला सुश्री भारती ठाकुर” नर्मदालय “म्हणुन ट्रस्ट व आदिवासी मुलांसाठी (बिना शासकीय मदतीच्या )”लेवा पुनर्वास” येथे शाळा चालवतात ती बघायला गेलो .जवळ जवळ १५०० मुले दुर दराज क्षेत्रातुन येतात त्यांना मोफत शिक्षण,दोन वेळचे जेवण व पालक,आदिवासी लोकांना ,समाजातल्या मुख्य धारणेत आणण्याचा प्रयत्न करतात आहे.पुर्णपणे समर्पित असा एक स्तुत्य उपक्रम आहे .त्यांचे “काम करा व कमवा “या धर्तीवर एक प्रौडक्शन केंद्र आहे.”फुल ना फुलाची पाकळी”अशी थोडी मदत दान स्वरूपात केली.त्या अशीच नर्मदा परिक्रमा करत असताना आजारी पडल्या,त्यांना एका आदिवासी कुटुंबाने स्वत:पोटाला चिमटा घेऊन मदत केली .ह्या घटनेने भारावुन जाऊन त्यांनी गोर गरिबांच्या उत्थाना चा विडाच उचलला,सरकारी नोकरी सोडुन ,लग्न न करता घरदार सोडुन त्या नर्मदा तिरी सेवा करायला सरसावल्या त्या कायमच्याच.नर्मदा अशीच योग्य व्यक्तीला हिप्नौटायईज करतात तसे बोलावून घेते असं म्हणतात.बरीचशी विभुती नाशिक ,आळंदी,पंढरपुर,नरसोबावाडी ,गांडगापुर,काशी अशा प्रसिध्द आध्यात्मिक क्षेत्रांमधुन तप करायला नर्मदा तिरी यायला प्रवृत्त झालेत,व तिथेच समाधिस्थ झाले.ते सगळे बघुन निघालो व संध्याकाळी ८ वा बडवानी मुक्कामी पोचलो.
२ : बडवानी : (२८मार्च)
इथुन पुढे १०० -१५० कि मी अंतरावर पण महाराष्ट्रात ल्या “शहादा “ला जायचे आहे.वाटेत राज घाटावर स्नान उरकुन,नर्मदेच्या संदर्भात जे महत्त्वाचे आहे ,ते ते पहायचे असे ठरले . त्या ठिकाणां च्या व्यतिरिक्त ,जमल्यास त्या त्या भागांत लोकाभ्यासा च्या द्रृष्टिने इतर काही दाखवणे हा “यशोधन”चा प्रयास असतो हा विशेष कौतुकाचा भाग आहे.तिथे ५२ गजा म्हणुन ओळखले जाणारे वृषभदेव(जैनांचे गुरू) आहेत ते बघायला गेलो.तिथे उंचावर,जवळपास १०० ‘- १२५‘ उंचीची पाषाणातील मुर्ती आहे .खुप पायर्या असल्याने आम्ही चढलो नाही ,पण मुर्ती खुपच छान आहे.नंतर पुढचा प्रवास सुरू.शहादा त्या मानांनी लवकर आले,पण तिथे न थांबता आधी ,काही ठिकाण पाहुन परत येण्याचे ठरले होते.तद् नुसार ,”तापी”,”गोमती “व गुप्त स्वरूपातील “पुलिंदा “या नद्यांचा संगम आहे तो बघितला.तापी नदी पण साधारण नर्मदेला समांतर पश्चिमेला वाहुन अरबी समुद्रालाच सुरत जवळ मिळते.इथे ती खुप जरी नाही ,तरी नर्मदेच्या बरीच जवळ आलेली आहे.घाटावरच गणेश व शिव मंदिरे आहेत तिथे दर्शन घेउन पुढे निघालो.थोडे अंतर गेल्यावर प्रकाशाला संगमेश्वर,केदारेश्वर व पुष्पदंतेश्वर अशी तिन्ही मंदिरे जवळ जवळ आहेत.तिन्ही शिवाची आहेत.पुष्पदंतेश्वर मंदिर आहे इथेच पुष्पदंत राजाने प्रसिध्द “शिव महिम्न “ लिहिले .अशी आख्यायिका आहे की गंधर्वराज शिवा चा निस्सिम भक्त होता व लक्ष बेल,फुलांनी पुजा केल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे . एक दिवस त्याला पुजलेला एकच फुल कमी पडले म्हणुन त्याने आपला एक दात तोडुन पांढर्या पुष्पहारात लावला. शिवाच्या ते लक्षात आले ते अंती प्रसन्न झाले .तेंव्हपासुन त्यांचे नांव पुष्पदंत पडले .ह्या भागाला “ दक्षीण काशी “पण म्हणतात कारण ब्रम्हदेवाने विश्वकर्माला एका रात्रीत इथे काशी नगरी स्थापन करण्यासाठी सांगितले होते .काम पुर्ण व्हायच्या आंत रात्र संपुन गेल्याने काम अपुर्ण च राहिले.
सध्या इथे मोठा डैम बांधला आहे.तद् नंतर परत शहादा ला गेलो व रात्रीचा मुक्काम केला.
३ : शहादा (२९ मार्च)
शहादा हुन भल्या पहाटे निघुन भालोद (गुजराथ) मार्गावर प्रवास सुरू.आमच्या बस वर यशोधन च्या जाहीरते नंतर “नर्मदा परिक्रमा”असे लिहिलेले होते. ते पाहुन एका अनोळखी पण श्रध्दाळु माणसाने बस थांबवायचे विनंती केली.त्याने श्री प्रकाश यांचे समोर ५०० च्या नोटांचे बंडल धरुन म्हणाला की नर्मदा परिक्रमा वासीयांना काहीतरी खिलवायची/पिलवण्याची इच्छा आहे.किती पैसे लागतील ,घ्या.ते म्हणाले चहाची वेळ झाली आहे पण गरम खुप आहे तेंव्हा तुम्ही मुर्तींना उसाचा रस द्या ,बस झाले.सगळे रसवंतीवर रस प्यायले,खुष झाले,तो दोन शब्द भावनाकुल बोलला,”आम्ही परिक्रमा नाही करू शकत तर एवढीच सेवा! “ ५००,१००० काहीसे त्यांनी खर्चले व खुष झाला.न ओळख न पाळख !परिक्रमा वासियांबद्दल इकडे अशी श्रध्दा,आत्मियता सहानुभुती दिसते व तसा अनुभव येतो. न जाणे त्यांच्या रूपात “अश्वत्थामाच “आशिर्वाद द्यायला आले असतील.प्रुफ तर काही च नसते!
भालोद म्हणजे गुजराथ येईपर्यंत चा हा भाग ,महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात येतो,जिथे आदिवासीयांचे बाहुल्य आहे. अजुनही शिक्षण, सुधारणा, सोयी या बाबी नगण्य आहेत. ह्या भागाला “शुळपाणी “चे जंगल म्हणुन ओळखल्या जाते.सतपुडा पर्वताची पश्चिमे कडची शेवटची पहाडी श्रृंखला ,घनदाट जंगल,अनेक डोंगर दर्या,वस्ती नगण्य,भौगोलिक रचनेमुळे लुटमारीच्या नेहमी घडणार्या घटना अशी इथली प्रसिध्दी असल्यामुळे पायी जाणार्या परिक्रमा वासियांना हा भाग दुर्गम व खडतर असतो .एकदा इथुन बाहेर निघाले की इतरत्र पायी चालण्या च्या परिश्रमा शिवाय भिती नसते ,असं म्हणतात.इतकीच आश्य्चर्य जनक व विपरीत गोष्ट म्हणजे काही लुटारु सोडले तर खुपशी लोक मदत करणारी च असतात. अशी किमदंती आहे की अश्वस्थामा सारखे चिरंजिवी (एकुण सात) आत्मा, लोकांचे शुळपाणी त रक्षण करतात, त्यामुळे गंभीर हानी होत नाही. बरेच जण ह्या भागांत नदी च्या काठांनी न जाता थोडे दुरून कच्या रस्त्यानी जाऊन ,पुढे पाउलवाटेवर येतात. पायी न गेल्याने तसला अनुभव अपेक्षीत नव्हता,तरी उत्सुकता खुप होती व धास्ती पण की बस लुटणे वगैरे तर होणार नाही .
वाटेत देवमोगरा येथे “कुंती माते चे “(क्वचित च आढळणारे)मंदिर लागले,तिथे कुंती ची मुर्ती धान्यावर ठेवली आहे,त्यातले थोडे धान्य प्रसाद म्हणुन देतात,जे आपल्या कोठीत टाकायचे ,म्हणजे घरी धनधान्याची आबादी येते अशी समजुत आहे.अजुन पुढे गेल्यावर” प .पु प्रतापे “ (मुळचे अमरावतीचे) यांचा आश्रम जिथे श्री दत्त मंदिरात काळ्या पाषाणात ली एकमुख दत्ताची सुंदर मुर्ती आहे ,जी च्या वर गोमुख स्पष्ट दिसते (जिला इतिहास आहे) ,पु टेंभे स्वामीची ची मुर्ती ,अवदुंबरा च्या झाडाच्या बुंध्यावर ,बाहेर स्पष्टपणे उभरून आलेली गणेशाची सोंड इ. सर्व बघण्या सारखे आहे.ते परिक्रमा वासियांना निःशुल्क राहण्याची ,सदावर्त ची सोय करतात.वाटेत संध्याकाळी नर्मदेत स्नान करुन ,(इथे स्नान केल्याने,कुंभात स्नान केल्याचे पुण्य मिळते म्हणे)कुंभेश्वर महादेवाचे दर्शन घेतले .
ह्या सगळ्या गोष्टी बघत बघत ,शुळपाणी ची हिरवी रानराई,बघत ,शुलपाणेश्वराचे दर्शन ,शनी मंदिरात दर्शन करुन ,भालोद केंव्हा आले ते कळले च नाही .शुळपाणी चा थोडा जंगली भाग नर्मदेच्या पैलतिरावर पर्यंत पसरला आहे.
एकुण, ओंकारेश्वर ते भालोद पर्यंतचा भाग पौराणीक इतिहासाच्या दृष्टिनी संपन्न आहे. येथील आध्यात्मिक गांभीर्य बहुदा येथील नर्मदेच्या गांभिर्यामुळेच असावे. तेच गांभीर्य पैलतिरावर पण गरूडेश्वर, नेमावर, नारेश्वर ह्या भागांत पण प्रकर्षांने जाणवते. जप, तप, साधना करण्यासाठीची शांतता, नर्मदेचे अवखळ, वेगवान, नटखट रूप असताना आढळत नाही. जसजशी ती शांत, विस्तिर्ण होत जाते, तसतसे तिच्या सानिध्यातले आध्यत्मिक महत्व वाढत जाते. असे पण असु शकते की प्रत्येक स्थानाची एक “स्थान देवता“, वास्तु देवता असते तसे त्यांच स्थानांचे वास्तुच्या दृष्टिने महत्व असणार.
सर्वसाधारणपणे सगळ्या नद्यांच्या उगमाला महत्व असते तसे अमरकंटकला आहे, किंबहुना कपिल सारख्या ऋषिं – मुनींनी तप करण्याव्यतिरिक्त, प्राचीन काळात, खुद्द शिवाने मैकल पर्वतावर वास्तव्य केल्याने, अमरकंटकला विशेष महत्व आहे.पण नंतर जबलपुर,हुशंगाबाद पर्यंत ती शांतता कोणाच्या डोळ्यात भरली नाही .फक्त घाट,स्नान ,पुजा व दिपार्चन एवढे महत्व आहे असे वाटते. तसे सगळ्याच नद्यांना आपण गंगा म्हणतो व पुजतो ती गोष्ट वेगळी.
— सतीश परांजपे
(क्रमश:)
Leave a Reply