सोळाव्या शतकाच्या सुरवातीला गोवा (आताचा ओल्ड गोवा व आसपासचा प्रदेश) हे त्याकाळचे मोठे शहर होते. दोन अडीच लाख लोकवस्ती. हे शहर युसूफ आदिलशहाने वसविलेले होते. येथे त्याकाळाच श्रेष्ठ आरमार स्थापन करणे त्यांच एक धेय्य होत. ततपुर्वी गोपिकापट्टन हे जुवारी नदीकाठील प्रदेश मोठ बंदर होत.
गोवा मोठ व्यापारी केंद्र होत. अरबातून घोडे आणून येथे उतरवित व मग ते येथून दूरप्रदेशात जात. जवळपासच्या ठिकाणाहून धान्ये, कडधान्ये, मसाला पदार्थ येत व मोठा व्यवहार चाले. सोने मोती हिरे जडजवाहरी व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. साहजिकच मनोरंजन करणारी साधने यथे भरपूर असतील. त्याकाळी गोव्याच्या उर्वरीत (आताचा अकरा तालुक्यातील)गोव्यातील लोकसंख्येपेक्षा या शहरात अधिक लोक निवास करीत होते. गावकरी पद्दतीत व्यवहार फक्त आताच्या तिसवाडी बार्देश व सालसेत मधे होता. इतर प्रदेशात फारच विरळ लोकवस्ती म्हणजे गाव अस नव्हतच. वरील तीन प्रदेशात(८५० चौरस कि. मी.) हजारभर देवालये होती. गोव्याच्या इतर प्रदेशात (२९०० चौ. कि. मी.) फक्त पंधरावीस देवालये असतील.
श्रीकांत बर्वे
Leave a Reply