नवीन लेखन...

ओले आले

ओले आले नावाचा मराठी चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ ला चित्रपट गृहात दाखल झाला. चित्रपटाचं नाव वाचून ते समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण काही अर्थ लागे ना. मग ठरवलं जाऊयाच चित्रपट बघायला. अर्थातच चित्रपटाला गेल्यावर त्याच्या नावाचं वेगळेपण आणि त्या चित्रपटाचं वेगळेपण लक्षात आलं.

बऱ्याच वेळा चित्रपटांत नायक आणि नायिका केंद्रस्थानी असते पण या चित्रपटाचा बाज काही वेगळाच. वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. बाप लेक यांच्या नात्याची उकल नाजूकपणे आपल्याला उकलून दाखवली गेली आहे यात. चित्रपट सुरू झाल्यापासून हास्याचे कारंजे उडू लागले चित्रपट गृहात. खुप दिवस चांगल्या दर्जाची कॉमेडी पहायला नव्हती मिळाली ती इच्छा हा चित्रपट पाहिल्यावर पूर्ण झाली. चित्रपट सुरू होतच जी खीळ घातली गेली ती अगदी शेवटपर्यंत टिकून होती. कुठेही हा चित्रपट कंटाळवाणा जाणवला नाही. वडील आणि मुलगा यांच्या गोष्टीचा प्रवास घडवणारी ही गाडी चावी फिरवताच छान सुरू होऊन उचलली गेली आणि पहिल्या गेअर मधेच आपलीशी वाटू लागली. मग दुसरा तिसरा आणि मग टॉपचा गेअर. गरज भासल्यास ब्रेक आणि एक्सलेटर देत हसत खेळत मनोरंजन घडवत चित्रपटाच्या एका वेगळ्याच शेवटाला आपल्याला पोहचवते. विचारांच्या पलीकडील शेवट, प्रेक्षकांना पचवण्यास जड असला तरी तो तेवढाच आशादायी आहे.

वडिलांनी मुलासाठी गायलेली आंगाई इमोशनल टच देतेच या चित्रपटाला तर मजा मजा करत यात येणारे काही twist म्हणजे एका कॉमेडीला मिळालेली आश्चर्याची झालर जणू. आजच्या काळात काम काम आणि काम त्यातून दुरापास्त होणारा आपुलकीचा संवाद आणि त्यातील हरवत चाललेली भावनिकता किती गरजेची आहे, कुठंलही नातं टिकवायला हे या चित्रपटातून दाखवलं गेलं आहे.

एक छान, साधी सध्याच्या परिस्थितीची कथा. त्यावर लिहिलेली पडदयावरून नजर न हटवू देणारी पटकथा आणि चेरी ऑन द टॉप म्हणजे पटकथेला मिळणारे संवाद. थेट प्रेक्षकांच्या कानातून हृदयापर्यंत पोहचणारे आहेत. उत्तम दिग्दर्शन आणि कानाला सुखावणारं संगीत आणि त्यातील बोल म्हणजे सोने पे सुहागा. चित्रपट म्हणजे एक टीम वर्क असते. त्यात प्रत्येक जण आपआपलं काम उत्तम करतो तेव्हा अशी उत्तम कलाकृती आपल्या समोर मांडली जाते.

चित्रपट पाहताना ही सगळी यादी पहिली आणि उत्तम कलाकृती देणारे पडद्यामागील कलाकारांची नावे समोर आली. त्यातील काही नावे तर माझ्या फ्रेंड लिस्ट मधलीच. संवाद लेखक गणेश पंडीत सरांना msg केला गेला माझ्या कडून. संवादातून माणूस माणसापर्यंत पोहचतो. गणेश सरांनी तर वेळोवेळी संवादाचे चौकार आणि षटकार मारले आहेत यात. “Sorry” या शब्दाचा अर्थ सांगणारा डायलॉग प्रचंड अर्थपूर्ण…… “प्रॉफिट म्हणजे सुख नाही तर सुख म्हणजे प्रॉफिट असते” सही….. सगळे एक सो एक डायलॉग. हसून हसून पोट दुखवणारे ते भावनिक होऊन डोळ्यातून अश्रु ही आणणारे. काही ठिकाणी कोपरखळी मारणारे, काही मार्मिक तर काही चित्रपट गृहाच्या काळोखात ही आपल्या बरोबर असणाऱ्या माणसाच्या आणि आपल्या डोळ्यातून समजून जाणारे आणि समजून घेणारे.

दुसरं नाव म्हणजे मंदार चोळकर. यांनी लिहिलेली गाणी. त्यांना ही वेळचं भान न ठेवून केला गेलेला msg. या दोघांनी ही मला लगेच आभार मानणारा msg पाठवले. मराठी माणसं… पाय जमिनीवर ठेवूनच काम करतात याचं आणि हे माझ्याशी कनेक्ट असल्याचं विशेष कौतुक वाटलं माझं मलाच.

“बाप हा बापच असतो पण त्याचा मुलगा जेव्हा त्याचा बाप होऊन त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या बापाचं लहान मुलात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.” ( हा माझा डायलॉग आहे.) एका वयानंतर बाप लेकात हे नातं तयार व्हायची फार गरज आहे हे तर नक्कीच.

जग फार मोठं आहे. त्यातील खूप गोष्टी, माणसं, कलाकृती आपल्याला आवडतात पण मनाला भिडणारं खूप नसतं, क्वचित एखादं असतं आणि तेच म्हणजे ही कलाकृती हा चित्रपट.

“आयुष्यातून काही गोष्टी कायमच्या निघून गेल्यावर ही जिवंत असणाऱ्या बरोबर गेलेल्या माणसाची साथ नसली तरी उरून राहतं ते नातं…..”

हे नातं दाखवणारा हा चित्रपट, चित्रपट गृहात जाऊन बघाच….. परत एकदा नव्याने आयुष्य सुरू होईल हे नक्की….

रुपाली चेऊलकर
१०/०१/२०२४

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..