मराठी नाट्य-चित्रपट अभिनेता ओम भूतकर यांचा जन्म. १ मार्च १९९१ रोजी झाला.
ओम भूतकर हा एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेता नाटककार आहे. ओमचे शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव विद्यालय येथे व महाविद्यालयीन शिक्षण बी एम सी सी येथे झाले. ओमने स. प. महाविद्यालयातून तत्त्वज्ञानाचं पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.ओम भूतकरने आपल्या कसदार अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक तरुण चेहरा म्हणून त्याच्याकडे बघितलं जात असून अभिनयाच्या क्षेत्रात त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यांची अभिनयाची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरू झाली. इयत्ता आठवीत असताना ‘छोटा सिपाई’ या चित्रपटासाठी २००५ मध्ये त्याला अभिनय क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
‘दोन शूर’ एकांकिकेसाठी अभिनयाचा सवाई करंडक मिळाला आणि ओमला पुरुषोत्तम करंडकाचा प्रथम क्रमांक मिळाला होता.‘छोटा सिपाई’ चित्रपटात चमकलेला ओम फास्टर फेणे चित्रपटात दिसला ‘एक कप च्या’, ‘यशवंतराव चव्हाण ः बखर एक वादळाची’ या चित्रपटात भूमिका केल्या तसेच ओमने आजोबा, अस्तु, लेथ जोशी या चित्रपटातसुद्धा भूमिका साकारल्या होत्या. ओम भूतकरची मुळशी पॅटर्न मधील राहुल्या ची भूमिका खूप गाजली होती. तसेच ओम ‘न्यूड’ चित्रपटात दिसला होता.सलमान खानच्या मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक ‘अंतिम’ मध्ये पण ओमने अभिनय केला आहे. ओम भूतकरने गिरीश कुलकर्णी यांच्या सोबत ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात अभिनय केला आहे. गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यांनी या पूर्वी देऊळ, फास्टर फेणे अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ओमने अभिनय आणि लिखाणाच्या माध्यमातून सिनेक्षेत्राशी नाळ जोडलेली आहे. ओमने मी…ग़ालिब (दोन अंकी हिंदी-मराठी नाटक,तसेच विठा (विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरील पुरस्कारप्राप्त नाटक) हि नाटके लिहिली आहेत. तसंच सुखन नावाचा उर्दू गजल आणि मुशायरा कार्यक्रम यांचे प्रयोग तो करत असतो.
ओम गेल्या सात वर्षांपासून उर्दूचा अभ्यास करत असून, ‘सुखन’च्या माध्यमातून त्यानं उर्दू साहित्यावरील मराठी संगीत कार्यक्रम, संकल्पना, भूमिका आणि दिग्दर्शन स्वतः संभाळून दर्जेदार साहित्य लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. जाणकार प्रेक्षक याला पसंतीची पोचपावतीही देत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply