नवीन लेखन...

एक unique Space

तो डबा घेऊन ऑफिसला गेला. मुलं आधीच school vanनी शाळेत पोहोचलेली. आता तिचा ‘personal time’ सुरु झाला.

Coffeeचा मग एका हातात, नी तिचा favorite Android partner सोबत, अशी थोडी निवांत टेकली, तेवढ्यात दारावरची bell वाजली. थोड्या नाराजीनेच तिनेदार उघडलं; पण चेहेऱ्यावर लगेच आनंदाची लकेर झळकली!

“अगं प्रिया! ये ना!” प्रियासुद्धा तिने दार उघडायची वाटच बघत होती.

“अगं काय सांगू? आज मी कित्ती कित्ती आनंदात आहे माहितीये!?” प्रिया balconyतल्या hanging झोपाळ्यामध्ये जाऊन बसली सुद्धा!

“अगं, झालं तरी काय?”

“का~ही विचारु नकोस. अस्संच झुल~त राहूदे मला.” प्रियाचे डोळे बंद होते.

“ठीक आहे, बस मग तू. मी कॉफी आणते तुझ्यासाठी”

“ए नको गं, तुझी कॉफी घेऊन इथेच बस तूही. किंवा ऐक ना! तू तुझं चालू ठेव. मला काही लागलं तर घेईन मी. मला इथे थोडावेळ बसू देत. शां~~त..

ती पुन्हा कॉफी sip करू लागली, एका वेगळ्या समाधानात, आनंदात.. हातात android होता, पण डोळे काही वेगळंच वाचत होते.. आपल्याला आपलं घर तर असतंच. पण त्याही सोबत आपल्या मैत्रिणीचं, जवळच्या शेजारणीचं, किंवा आईचं, असं एक घर, घराचा कोपरा असतो, पेक्षा असावाच! तिथे आपल्याला कुणीही काहीही विचारत नाही. आपल्याला हवा असलेला, हक्काचा pleasure break, दुःखात, संकटात,  एकांतात रडायला, किंवा कोणत्याही प्रसंगी जाऊन शांत बसता यावं, अशी जागा! आपापल्या घरी तर अशी आपली खास जागा असतेच, पण ती जेव्हा आपल्या आवडत्या, विश्वासाच्या व्यक्तीसोबत न सांगता share करता येते, ती space, अगदी uniqueच ना!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..