आपल्या दररोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असणारा हा मसाले वर्गामधला घटक.खरोखरच कापत असताना जरी सर्वांना रडवत असला तरी देखील आपल्या विशिष्ट चवीने रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव आणतो.हा सुद्धा जमिनी खालीच उगवणारा कंद आहे.ह्याचे दोन प्रकार आहेत पांढरा आणि लाल.पांढरा कांदा चवीला गोड असतो तर लाल कांदा चवीला तिखट असतो.
कांद्याची चव तिखट गोड असते आणि हा अनुष्णशीत असतो थोडक्यात सांगायचे तर कोमट पाणी कसे असते तसा त्यामुळे हा शरीरातील वात आणि कफ दोष कमी करतो पण पित्त वाढू देत नाही.औषधे पोटात घयायची असतील तर त्यासाठी पांढरा कांदा वापरावा पण बाहेरून लावण्यासाठी लालकांदा उत्तम.
चलातर आता तुमच्या स्वयंपाक घरातील कांदा वैद्याची भूमिका कशी बजावितो हे पाहूयात ना!
१)मुळव्याधी मध्ये ब-याच जणांना संडासला घट्ट होते त्यांनी कांद्याचा रस दह्यात मिसळून खावा.
२)जुलाब होत असल्यास अथवा आव पडत असल्यास कांद्याचा रस साजूक तूपासोबत प्यावा.
३)कांदयाच्या आडव्या गोल पातळ चकत्या कापाव्यात प्रत्येक चकतीवर खंडीसाखर घालून एकावरएक रचून ठेवावी काही वेळाने जो रस वाटीत उतरेल तो सर्दी ,खोकला ह्यात कफसुटून पडायला उत्कृष्ट काम करतो.
४)खरूज अथवा गजकर्ण ह्यात कांद्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा खाज देखील कमी होते आणि व्याधी बरा होतो.
५)मार लागणे,मुरगळणे,सुज ह्यावर कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल एकत्र करून कोमट करून दुखणा-या भागावर लावावे सूज आणि वेदना एकदम कमी होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply