ओंजळभर मोती,
आई तुझ्यासाठी,
कष्टलीस ग बाई,
सारखी संसारासाठी,–!!!
ओंजळभर सोनचाफा,
आई तुझ्यासाठी,
पोळल्या जिवाला गारवा,
मिळेल तुझ्यापाशी,–!!!
ओंजळभर मोगरा,
आई तुझ्यासाठी,
सौंदर्यातील सुगंधाने,
आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!!
ओंजळभर चंदन,
आई तुझ्यासाठी,
उगाळून झिजलीस,
आमुच्या भल्यासाठी,–!!!
ओंजळभर मरवा,
आई तुझ्यासाठी,
सारखी फुलत राहशी,
तूच आमुच्यासाठी,–!!!
ओंजळभर अश्रू,
आई तुझ्यासाठी,
किती झालीस रिक्ती,
देणीघेणीअजून चालती,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply