नवीन लेखन...

नागरिक पत्रकार (Citizen Journalist) बना !!!

नागरिक पत्रकार (Citizen Journalist) बना !!!

काही विषय, काही प्रश्न असे असतात की जे विचारायला व्यासपीठच नसतं. कोणा ना कोणाच्या अडचणीचे हे प्रश्न असतात. पेपरवाले, चॅनेलवाले या प्रश्नांना वाचा फोडू शकतात. पत्रकारांना इच्छाही असते. पण कधीकधी त्यांचेही हात बांधलेले असतात असं वाटतं. कदाचित काहीजण मान्य करणार नाहीत, किंवा खाजगीतही मान्य करतील, पण वृत्तपत्रात काम करणाऱ्यांना पहिले सांभाळायला लागतात ते मालकांचे हितसंबंध. मग असे बरेचसे पत्रकार विविध टोपणनावांनी लिहून आपली मुक्तपणे लिहिण्याची इच्छा पूर्ण करतात.

सामान्यांना तर बिचार्‍यांना आवाजच नसतो. आपल्या अवतीभवती जे काही घडतंय ते लोकांना कळावं ही इच्छा तर असते पण लिहायचं कुठे? कोण छापणार? आणि मुख्य म्हणजे वाचणारही कोण?

आता मात्र मराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार योजनेने हा प्रश्न सोडवलाय. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना टिपून त्या आपण आता थेट अपलोड करु शकाल मराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार विभागात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरांमध्ये स्वतंत्र नागरिक पत्रकारांची नेमणूक करायची आहे. या नागरिक पत्रकारांना लेखनासाठी सर्व प्रकारची सॉफ्टवेअर, वेबसाईटवर भरपूर जागा, फॉन्ट कन्व्हर्टर, मराठी इ-मेल यासारख्या सुविधा देण्यात येत आहेत.

याशिवाय मुक्त पत्रकारितेसाठी मोठ्या प्रमाणावर माहितीचा साठा, वेबसाईटसची जंत्री, इ-पुस्तके सारखी संदर्भ-साधने हेसुद्धा या नागरिक पत्रकारांना उपलब्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील नामवंत पत्रकारांशी दर महिन्याला प्रत्यक्ष भेटीगाठी आणि सातत्याने ऑनलाईन चर्चा करण्याची संधी फक्त आमच्या नागरिक पत्रकारांसाठी!!!

या माध्यमातून आपण आपलं स्वत:चं एक ऑनलाईन वृत्तपत्रही सुरु करु शकाल एवढी या माध्यमाची क्षमता आहे. आपल्याकडे सातत्याने लिहिण्याची तयारी असेल तर आम्ही आपल्याला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू… अगदी वाचकसुद्धा.

खरंतर पत्रकारिता हा व्यवसाय नाही. पत्रकारिता हे एक व्रत आहे. मात्र आज त्याला व्यवसायाचं स्वरुप आलेलं आहे. शेवटी अर्थार्जन हे तर महत्त्वाचंच.

नागरिक पत्रकारांना या माध्यमातून अर्थार्जनाचीही संधी आहे. ही नोकरी नाही. हा आहे स्वतंत्र व्यवसाय. केवळ रु.5,000/- इतक्या नाममात्र गुंतवणूकीत व्यवसाय सुरु करण्याची ही अमूल्य संधी आहे. पहिल्या टप्प्यात 1000 नागरी पत्रकारांना या संधीचा लाभ घेता येईल.

आपल्याला दिल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर आणि इतर सुविधांच्या रुपात ही सर्व गुंतवणूक तात्काळ परत मिळेल. याशिवाय जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला नियमित उत्पन्नाची संधीही आहेच.

या योजनेत सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रात असणारे अनुभवी पत्रकारही सामिल होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा…..

दूरध्वनी: (022) 25421185 / 9820310803

— मराठीसृष्टी

3 Comments on नागरिक पत्रकार (Citizen Journalist) बना !!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..