सांधे दुखणे, सांध्यांची हलचाल योग्य प्रकारे न होणे, चालताना, वाकताना, उठताना-बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे त्रासदायक होणे ही सर्व लक्षणे उतारवयी उत्पन्न होणारी लक्षणे आहेत मात्र बदलती जीवनशैलीमुळे आज तरुणांमध्ये सुद्धा सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.
संधिवाताचे अनेक प्रकार असून त्यांची वेगवेगळी कारणे असतात. संधिवाताच्या प्रकाराचे निदान करताना खालिल मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
1. सांध्यांची झीज झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
2.सांध्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
3.सांध्याला दुखापत झाल्याने सांधा दुखतो का,
4. हाडांच्या फ्रॅक्चरमुळे सांधा दुखतो का,
5. रक्तामध्ये युरिक एसिड चे प्रमाण वाढल्यामुळे Goutची स्थिती निर्माण झाल्याने सांधे दुखतात का,
7. आमवात आहे की संधिवात आहे,
7. मधुमेह, स्थुलता यासारख्या विकारांमुळे संधिवात झाला आहे का, अशा अनेक गोष्टींचा विचार करुन संधिवाताच्या प्रकाराचे निदान करुन योग्य उपचार योजावे लागतात.
चिकित्सक सल्ला जरूर घ्यावा …
हल्ली तरुण वयातच महिलांना संधिवाताचा त्रास होऊ लागला आहे. अनियमित खाण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली हीदेखील हा आजार होण्यामागची कारणे आहेत. या आजाराला कसा प्रतिबंध घालता येईल त्याची माहिती घेऊया…
वातावरणातील प्रदूषण, धूम्रपान, आरोग्यदायी आहाराचा अभाव यामुळे संधिवात जडण्याची शक्यता असते. पण, अॅण्टीऑक्सिडंट तसेच हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने संधिवात टाळता येतो. जेवणात योग्य प्रमाणात प्रोटीन (शरीराच्या वजनाच्या प्रतिकिलो मागे एक ग्रॅम याप्रमाणे) गरजेचे आहे. त्याशिवाय व्हिटॅमीन डी व कॅल्शिअमचीही गरज आहे.
काय टाळावे?
गुडघ्याला संधिवात असेल तर जॉगिंग व दोरीच्या उड्या यासारखे व्यायाम टाळावेत. सायकल व पोहोण्याचा व्यायाम गुडघ्यांसाठी चांगला आहे. संधिवाताचा त्रास असलेल्यांनी गरजेनुसार व शरीराला झेपेल असाच व्यायाम करावा. स्नायू बळकट करण्यासाठी व्यायामाचा चांगला उपयोग होतो. यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना स्थरिता येते आणि योग्य चपला वापरल्या तर त्याचा फायदा होतो.
व्यायामाचा फायदा संपूर्ण शरीरासाठी असतो. अनेक लोक व्यायाम म्हणून चालतात. पण, शरीराच्या वरच्या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. एकाच प्रकारच्या सांध्यांचा अतिवापर केल्याने त्यावर लवकर ताण येतो. म्हणून शरीराच्या सर्व भागांना सारखाच व्यायाम मिळणे गरजेचे आहे. सर्वसामान्यपणे दुर्लक्षित राहणारा व्यायामाचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग नियमीतपणे केल्यास सांध्यांमध्ये संतुलन राहते. जखमी होण्याचा धोका टाळायचा असेल तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे गरजेचे आहे; पण ते करताना सांध्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.
सवयी बदला
संधिवात झालेल्या महिलांना जीवनशैलीत सुधारणा केल्यास फायदा होतो. जमिनीवर बसणे, जिने चढणे, भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर यांचा गुडघ्याचा संधिवात असलेल्यांना त्रास होतो. त्यापेक्षा कमोडचा वापर करावा. औषधांमुळे कार्ट्रिजेसची झालेली हानी भरून निघत नसली तरी दुखणे, सूज येणे कमी होते. वेदना कमी होतात. तसेच सांध्यांची कार्यक्षमता सुधारून त्यांचे रक्षणही करता येते.
आमवात संधिवात….
सांध्यांना विचंवाने दंश करावा अशा वेदना. हातापायाची हालचाल होत नाही. साध्यांना सूज, चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप असतो, कष्ट सहन होत नाहीत, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखाच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातपायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीहि बरे होण्यास फार मोठी मदत होते.
कंबरेचा व पाठीचा शूल :
कंबर वाकता येत नाही. पाठही दूखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेली एरंडमुळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.
— सुषमा मोहिते
आरोग्यदूत
Leave a Reply