ब्रिटीश कवी T. S.Eliot यांच्या Waste Land या कवितेने प्रेरित होऊन मी लिहलेली ओसाड जमीन ही कविता
कित्येक गढूळ लोंढे प्रत्येक ऋतूत
शहराच्या गल्लीबोळात शिरतात
रिकाम्या निर्जन शांततेच्या सागरात
चेहरा नसलेली धक्का खात फिरतात
पेरणी करून अथवा तरव्यासाठी कोवळं पेटवूनही
येथे प्रेतांना धुमारे फुटतच नाहीत
खाली मान घालून अंत्ययात्रेत सुतक पाळणारे
एकमेकांना ओळखू येतीलच असे नाहीत
संवेदना सुगंधीत कफनात गुंडाळून
अर्धमेलेले मृत्यू भासावेत तसे
कांचन,रंगद्रव्यांनी माखलेले बुरखे
खरे खोटे ओळखावेत कसे
झऱ्यांचं शुभ्र खळखळतं हसणं दिसत नाही
वाऱ्यांचे मंजुळ नाद कोणाच्या कानात गुंजणार नाहीत
ज्यांनी ही सुंदर फुललेली जीवनाची बाग नाकारली
ते शाश्वत व अटळ मृत्युंची आशा धरणार नाहीत
दुपारी शरदाच्या तपकिरी धुक्यात
येथे सर्वच काही वास्तव राहत नाही
दबलेल्या , ओझ्याखाली यंत्रवत झालेल्या
ओसाड जमिनीत शुद्ध प्रेम मात्र उगवत नाही
प्रकाश भोसले
मल्हारपेठ – सावर्डे
9421974209
Leave a Reply