नवीन लेखन...

अस्थिसच्छिद्रता (ऑस्टिओपोरोसिस)

हा एक चयापचयाचा रोग आहे. यात हाडाची घनता कमी होते व बाह्यकाची जाडी कमी होते. हाडाची झीज आणि भर ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तिशीपर्यंत हाडाचा बाह्यक (कॉर्टेक्स) कठीण होत जातो. नंतर हाडाची झीज व भर समतोल झाल्यास हाडाचा कठीणपणा तसाच राहतो; पण त्यात, तफावत पडून झीज जास्त झाली तर हाडात सच्छिद्रता येऊन कठीणपणा कमी होतो. पाठीच्या कण्यात, खुब्यात, हाताच्या रेडियस हाडात जाळीदार भागाची झीज होते, पुरुषांच्यात याचे प्रमाण २० ते ३०%, तर स्त्रियांत ४० ते ५०% असते.

चाळीशीनंतर हाडाच्या बाह्यकाची झीज वर्षाला ०.३ ते ०.५%२०८ होते. रजोनिवृत्तीनंतर वेग वाढतो. हाडांच्या झीज-भर प्रक्रियेत भर मंदावते/थांबते व झीज होऊन हाड मोडण्याची शक्यता वाढते. बुटक्या, कमी वजनाच्या स्त्रियात, धावण्याच्या शर्यतीत, अॅथलेटिक्समध्ये सतत भाग घेणाऱ्या तरुणी, खूप नाच करणाऱ्यांत, जंक फूड सातत्याने खाणाऱ्यात, अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांत, दीर्घकाल कॉर्टिसॉन घेणाऱ्यांत अंगावरचे मेदाचे प्रमाण कमी होते; परिणामी इस्ट्रोजेन संप्रेरक कमी होऊन कॅल्शियम कमी होते व अशी अस्थिसच्छिद्रता येते. श्वेतवर्णियात कृष्णवर्णियांपेक्षा अस्थिसच्छिद्रता जास्त आढळते. पाठीचे ‘मणके आक्रसतात, उंची कमी होते. कणा दुखतो व अस्थिभंग होऊ शकतो. ज्या स्त्रियांची ‘डाएटिंग’ मुळे भूक मंदावलेली असते, वजन कमी असते तसेच खूप व्यायाम करणाऱ्यात, धूम्रपान, मद्यपान करणाऱ्यांत अस्थिसच्छिद्रता जास्त आढळते.

ज्यांची जीवनशैली बैठी असते. त्यांच्यातही हा जास्त आढळतो; कारण बैठ्या जीवनशैलीत हाडांवर दाब पडत नसल्यामुळे झीज जास्त होते. बिछान्याला खिळून पडलेल्या रुग्णात, अंतराळवीरात महिन्याला १% हाडाचे वजन व कॅल्शियम कमी होते. आम्लयुक्त व अतिप्राणिज प्रथिनांचा आहार. उदा. मटण, बीफ हाडाची झीज लवकर करतो. म्हणून मध्यम वयापासून ते वर्ज्य करावेत. कॅल्शिअमचे क्षार, दूध, अंड्यातील बलक, कवचधारी मासे, पालेभाज्या कॅल्शिअमचे स्रोत.९८% कॅल्शिअम आपल्या हाडाच्या सांगाड्यात असते, रक्तातील कॅल्शिअमची पातळी ८ ते १० मि. ग्रॅ./सी.सी. अशी स्थिर असते. प्रौढात रोज १ ग्रॅम कॅल्शिअम शोषले जाते व १००-४०० मि. ग्रॅ. लघवीवाटे जाते. कॅल्शिअम न्यूनता झाल्यास चेता व स्नायूदाह होऊन स्नायूतंतू सतत आकुंचन पावतात, हाता-पायात पेटके येतात, आकडी येते, श्वासनलिका व श्वसनयंत्राचे आकुंचन होऊन मृत्यूही येऊ शकतो.

डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..