सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचा शोध लावणारे ओटो विक्टरले यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला.
चेक रिपब्लिकचे केमिस्ट असलेले ओटो यांना अगदी सुरवातीपासून विज्ञानाची आवड होती. त्यांनी १९३६ मध्ये प्राग इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मधून जैविक रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती. पुढे काही काळ त्यांनी प्रोफेसर म्हणून देखील काम केले.
१९५० मध्ये त्यांनी डोळ्यांच्या प्रत्यारोपणसाठी एक पाणी शोषून घेणाऱ्या आणि पारदर्शी जेलचा शोध घेत होते, त्यातून आधुनिक कॉन्टेक्ट लेन्सची निर्मिती झाली.
ओटो हे स्वतः चष्मा वापरत होते आणि त्यांनी त्यावर उपाय म्हणून आधुनिक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला.
ओटो विक्टरले यांचे १८ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले. गेल्या वर्षी गुगलने आपल्या डूडल मधून ओटो विचटरले यांना मानवंदना दिली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply