काय पुण्य ते काय पाप ते,
मनाचा खेळ हा
ज्यास तुम्ही पापी समजता,
कसा तो तरूनी गेला….१,
कित्येक जणाचे बळी घेवूनी,
वाल्या ठरला होता पापी
मनास वाटत होते आमच्या,
उद्धरून न जाई कदापी….२,
मूल्यमापन कृतीचे तुमच्या,
जेव्हा दुसरा करतो,
सभोवतालच्या परिस्थितीशी,
तुलना त्याची तो करतो …..३
तेच असते पाप वा पुण्य,
आमच्या अंत:करणा वाटे
आतील आवाज सत्यचा,
तोच तुमच्या मनास पटे….४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply