पाऊस सरी पडतांना
गारवा अंगास झोंबतो,
मिठीत तू अलवार घेता
घन ओथंबून पाऊस येतो
मलमली मिठीत मी येता
अश्रूंचा बांध अलगद फुटतो,
डोळे हलकेच तू पुसता
तो पाऊस मनात मोहरतो
किती मनोहर हा नजारा
डोळ्यांत निसर्ग खुलतो,
हा ओला हिरवा गालिचा
थेंब पावसाचा हृदयात मिटतो
घन व्याकुळ मी होते
चिंब पावसाळी नभात या,
कधी भेटशील सख्या तू
या कातरवेळी तू जवळी हवा
धुक भरली ही वाट न्हाली
तुझी वाट कितीक पाहवी,
मन अधीर पाऊस सरीत या
तुझ्यात चिंब भिजते मी सर होऊनी
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply