अवेळी पाऊस पडला
लक्षण काही चांगला नाही |
पाऊस म्हणाला माझं की
तुमचं ते मला कळत नाही || १ ||
प्रदूषणाच्या मार्याने मी
वैतागलोय पुरता
निसर्गाला आव्हान देवून
माणूस ठाकला उभा |
निसर्ग म्हणतो थांब बेट्या
ठेवणार नाही एकही जागा || २ ||
विज्ञनाच्या उंटावरचा
तू अति शहाणा |
मडके फोडायच्याऐवजी
म्हणशील मानच कापा || ३ ||
तुझ्या लंब्याचौड्या गप्पांचा
तुला आलाय माज |
एका क्षणात उतरवेन मी
सारा तुझा साज || ४ ||
— चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply