नवीन लेखन...

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।।

संसाराचा खेळ मांडला

खेळविसी तूं मजला

थकूनी मी जाई   ।।१।।

पावन हो तू आई तव चरण शरण येई

 

रात्रंदिनीं ध्यास लागला

जीव माझा तगमगला

झोप तर येतच नाही   ।।२।।

पावन हो तू आई तव चरण शरण येई

 

आळवितो मी तुजला

विसरुनी देहभानाला

नयनी तव रुप पाही   ।।३।।

पावन हो तू आई तव चरण शरण येई

 

देह झिजविला

दुर सारुनी सुखाला

कां तप फळा न येई   ।।४।।

पावन हो तू आई तव चरण शरण येई

 

साद दे हांकेला

पेटलो आहे हट्टाला

नसता परत जन्म घेई   ।।५।।

पावन हो तू आई तव चरण शरण येई

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..