नवीन लेखन...

पद्मश्री लीला पूनावाला !

त्यांची आणि माझी प्रथम भेट नक्की कुठे झाली आठवत नाही. बहुधा पुण्यातील एखाद्या HR कार्यक्रमात झाली असावी. visiting cards ची देवाण -घेवाण झाली. माझ्या सवयीनुसार त्यांच्या कार्डमागे तारीख /वेळ /प्रसंग वगैरे मी लिहिले. स्मृती लख्ख राहाव्यात आणि भविष्यकालीन संदर्भासाठी नोंद असावी म्हणून माझा मित्र रविशंकरने मला ही सवय लावली आहे.

बालाजी सोसायटीत मी MBA चा डायरेक्टर (२००४ साली )असताना आम्ही Industry Institute Cell स्थापन करण्याचे ठरविले. पहिली batch पास आऊट होऊन बाहेर पडणार होती ,त्यांच्या प्लेसमेंटच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करायचे यावर आमचा खल चालला होता. अचानक मॅडमचे नाव आठवले. त्यांना इ-मेल पाठविली. त्यांचा तत्परतेने रुकार आला. आम्ही खुश ! तयारीला लागलो. जूही नामक आमची TPO होती. ती संयोजक असल्याने, तिला मी विश्वासाने मॅडमचा मोबाईल नंबर दिला.

साधारण पंधरा दिवसांनी, ठरलेल्या दिवशी,ठरलेल्या वेळी त्या आमच्या संस्थेत येऊन दाखल झाल्या.

भाषणादरम्यान म्हणाल्या – “पाश्चात्य देशात Reminder ची पद्धत नाही. तिथे reminder हा अपमान मानतात. मला एखादे काम सांगितले आहे ना , मग मी ते करणारच ! त्यासाठी वारंवार आठवण करून देणे म्हणजे त्या व्यक्तीवर अविश्वास दाखवल्यासारखे होते. आणि तिकडे सहसा ते कोणालाही आवडत नाही.I also hate reminders !”

आम्हाला त्यांचा रोख कळेना. वाटलं बहुधा MBA च्या मुलांना त्या मार्गदर्शन करीत असाव्यात.

क्षणभर थांबून त्या म्हणाल्या – ” जूही कोण आहे इथे ?”

तिच्याकडे वळून म्हणाल्या – ” या तरुणीने मला गेल्या काही दिवसात अक्षरशः भंडावून सोडले आहे. सारखे फोन करुन ” तुम्ही नक्की येणार ना ? सोबत कोण असेल ? पत्ता माहित आहे का ? कोणाला तुम्हाला घ्यायला पाठवू का ? कार्यक्रमानंतर जेवायला थांबणार ना ? ” वगैरे वगैरे ! तिचा हेतू चांगला होता पण कदाचित अतिउत्साहाच्या भरात हा follow -up चालला असावा. शेवटी एकदा कंटाळून मी तिला सांगितले -बाई गं, मी एकदा शब्द दिलाय ना ,मग मी येणार म्हणजे येणार !आता माझा पिच्छा सोड .”

ही सगळी कानटोचणी हसत हसत चालली असली तरी मी ओशाळून गेलो. माझ्या पश्चात तिने हे उद्योग केले आणि मला सांगितलेही नाही. एवढया मोठया अधिकारपदावरील व्यक्तीला हा जाच वाटणारच ! मी त्यांचा नंबर जूहीला देऊन मोठीच चूक केली होती.

Reminder चा धक्का मारल्याशिवाय या भारत देशात, सगळ्याच क्षेत्रात गोष्टी पुढे हलत नाही. काही निर्लज्ज व्यक्ती तर reminder हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क मानतात. ” काय राव ,आठवण तर करून दयायची “असं सर्रास म्हणतात. विसरणे हा आमचा राष्ट्रीय धर्म झालाय. त्या पार्श्वभूमीवर लीला पूनावालांचे इ -मेलला पाच मिनिटात उत्तर येणे (दुसरी व्यक्ती म्हणजे इन्फोसिसचे नारायण मूर्ती ) हेच अप्रूप वाटते. या दोघांना मी अनेकवेळी माझ्या संस्थेत एखादया समारंभाचे निमंत्रण पाठवितो .(मागीलवर्षी कराडच्या नॅशनल कॉन्फरन्स च्या उदघाटनाचे मॅडमना मी निमंत्रण दिले आणि त्यांनी अभिजात विनम्रपणे ते नाकारले.) आपल्या आसपासच्या या महनीय व्यक्ती किती सहजपणे (कोठलाही आव न आणता) आपल्याला आदर्श जीवनाची सोपी सूत्रे शिकवून जातात नाही?

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..