प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे:
खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.
संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. पद्मावत महाकाव्याची कथा संक्षेप मध्ये सांगताना महाकवी जायसी म्हणतात
“तन चितउर, मन राजा कीन्हा हिय सिंघल, बुधि पदमिनि चीन्हा।
गुरू *सुआ जेई पन्थ देखावा बिनु गुरू जगत को निरगुन पावा?
नागमती यह दुनिया–धंधा।बाँचा सोइ न एहि चित बंधा।।
राघव दूत सोई सैतानू।माया अलाउदीं सुलतानू”।।
चित्तोडगढ हे माणसाचे शरीर आहे. रत्नसेन नावाचा आत्मा या शरीरात विराजमान आहे. त्याच्या मनात परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा आहे. गुरु बिना परमेश्वराची प्राप्ती संभव नाही. हिरामन नावाचा पोपट हा गुरु आहे. तो रत्नसेनला मार्ग दाखवितो. सिंहल द्वीप हे प्रेमाने भरलेले हृदय आहे. या सिंहल द्वीपात वाघ आणि बकरी एकाच घाटावर पाणी पितात. अर्थात हे हृदय प्रेमाने भरलेले आहे. सात्विक बुद्धी रुपी पद्मावती तिथे निवास करते. शरीररुपी चित्तोड मध्ये तांत्रिक राघव चेतन नावाचा शैतान हि राहतो. त्याच्या पाशी मायावी शक्ती होत्या. तो चंद्र्माच्या कला हि आपल्या शैतानी मायेच्या शक्तीने बदलू शकत होता. पद्मावती चित्तोडला येते. राघव चेतन नावाच्या शैतानाला देश निकाला दिला जातो. अर्थात ज्या हृदयात सात्विक बुद्धी आहे तिथे शैतान निवास करू शकत नाही. अलाउद्दीन खिलजी हा भोग आणी विलासात बुडालेला संसारिक मायेने ग्रस्त मर्त्य मानव आहे. तो आरश्यात पद्मिनीला बघतो. आरसा हा आभासी आहे. मायावी जगाचे प्रतिक. आरश्यातील पद्मिनी हि आभासी. मोह आणि मायेने ग्रस्त अलाउद्दीन खिलजी आभासी पद्मिनीच्या प्राप्तीसाठी चित्तोडवर आक्रमण करतो.
महाकाव्याच्या अंती गुरुचे मार्ग दर्शन, प्रेमपूर्ण हृदय आणि सात्विक बुद्धी (पद्मावती)च्या सहाय्याने शरीराचा त्याग केल्यावर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होते. अलौकिक प्रेमाचा विजय होतो.
राजपूत स्त्रिया हवन कुंडात सर्वस्व अर्पण करतात, सती होतात. राजपूत योद्धा संपूर्ण चित्तोड गढाला अग्नीत अर्पण करतात व युद्धात प्राणांची आहुती देतात. सर्वस्व अर्पण केल्यावर त्यांना हि अलौकिक प्रेमाची प्राप्ती.
संसारिक मोह मायेला सत्य समजणाऱ्या अलाउद्दीन खिलजी काय प्राप्त होते. शरीर नष्ट झाल्या वर बाकी राहते फक्त शरीराची धूळ किंवा चितेची राख. खिलजीच्या हाती राख आणि धूळी शिवाय काहीही येत नाही.
सारांश भोग आणि विलासितेत बुडालेल्या संसारिक जीवाला मुक्ती नाही. अलौकिक प्रेमाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. पद्मावतच्या माध्यमाने महाकाव्याची महाकवी जायसी यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
— विवेक पटाईत