पाहण्या तुला चंद्रमा उत्सुक, माजला मनात कोलाहल,अशी कुठली बरे चांदणी,
जिच्याशी रंगतो प्रेम- खेळ?
सुंदर सुरेख कोमलांगी,
भासतेस, चाफ्याचे फूल,
सुंदर सोनसळी रंग त्याचा,
ज्याची दुनियेला पडे भूल,–!!
त्या चंद्रम्यासारखा,
मीही, तुझा प्रेमवेडा,
प्रेमाच्या रजतकिरणी,
न्हाऊन निघतो केवढा,–!!
हात तुझा हाती येता ,
बघ कसा जळतो बिचारा,
प्रेम दिवस त्याला न मिळे,
कधी करण्यास साजरा,!!
आभाळीचा चांद आज,
माझ्यासाठी खाली उतरला,
महत्व प्रेमाचे जाणत जाणत अलगद ओंजळीत आला,!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply