आला आला आला आला
आला पैलतीर ।
चला चला चला आता
गावु हरिनाम आले हरिद्वार ।। धृ ।।
त्रिभुवनी केवळ एक सत्य
एकची हरिनाम ।
मनुजा मोहमाया मृगजळ सारे
येथे नाही कुठे राम ।
जीव हा चालता, बोलता
झणी जाईल सोडुनी दूरदूर ।। १ ।।
जीवनी सारे सुख दुणावे,
दुःख ते उणावे ।
जगता जगता सकला जगवुनी
नित्य रामनाम घ्यावे ।
नाम भजता भजता हरिनाम
अंती भेटावा कृपाळू हरिहर ।। धृ ।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ७७.
११ – ३ – २०२२.
Leave a Reply