नवीन लेखन...

चित्रकार दीनानाथ दलाल

चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म ३० मे १९१६ रोजी मडगाव गोवा येथे झाला.

दीनानाथ दलाल यांचे पूर्ण नाव नृसिंह दामोदर दलाल नाईक. १९३७ मध्ये जी.डी. आर्ट ही परीक्षा उत्तीर्ण होताच दलालांच्या कारकिर्दीस सुरवात झाली. १९४४ मध्ये दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना करून दलालांनी मराठी प्रकाशनविश्वासत पुस्तकांची मुखपृष्ठे, अंतरंगचित्रेरं रेखाटण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच लोकांना त्यांच्या कामातील कलात्मक ताकदीचा परिचय होऊ लागला. मराठी पुस्तकांचा चेहरामोहरा बदलू लागला. नवे मराठी पुस्तक आणि दलालांनी रंगवलेले मुखपृष्ठ असे जणू समीकरणच झाले होते. त्या काळात दलाल नावाची मोहिनी मराठी रसिकांवर पडली होतीदलालांची चित्रे हिंदुस्थानी मातीशी नाते सांगणारी होती. आपल्या जीवनातले रंग घेऊनच ती नटलेली होती. त्यांची रेषा अत्यंत सशक्त आणि लवचीकही होती. तिच्यात जोरकस प्रवाहीपणही होते आणि हळुवार लयकारीची नजाकतही होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलींचे संस्कार त्यांच्या चित्रात दिसत. वास्तववादी चित्रणातील त्यांचे कसब वादातीत होते. दीनानाथ दलालांना साहित्याची मनापासून आवड होती. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, प्रवासवर्णन, वैचारिक, विनोदी, ललित, ऐतिहासिक असे सर्व साहित्यप्रकार त्यांच्यासमोर येत व त्यांना योग्य ते न्याय देणारे चित्र ते साकारत.

दलाल १९३८च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या ‘वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली. अनेक नियतकालिके, पुस्तकांची मुखपृष्ठे, त्यांनी स्वत: सुरू केलेल्या ‘दीपावली’ या अंकातील चित्रे, भारतीय मिथकांवर आधारित चित्रांपासून ते सामाजिक, ऐतिहासिक विषयांवरील चित्रे तसेच राजकीय व्यंगचित्रे अशी विविध प्रकारांतील चित्रे त्यांनी रेखाटली होती. विशेषत: त्यांनी काढलेल्या मुखपृष्ठांनी मराठी साहित्यात सुमारे तीन दशके ‘दलालयुग’च निर्माण झाले होते. १९४५ मध्ये दलालांनी ‘दीपावली’ या वार्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. दर्जेदार साहित्य व दलालांच्या उत्तमोत्तम चित्रांनी सजलेला ‘दीपावली’ अल्पावधीतच लोकप्रिय झाला. रसिक आतुरतेने त्याची वाट पाहू लागले. हातांत व्यावसायिक कामे प्रचंड असूनही वेगळा वेळ काढून दलालांची स्वान्त सुखाय चित्रनिर्मिती चालू असे. भारतातील विविध चित्रप्रदर्शनांत त्यांचा सहभाग असे. दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात १३ वेळा दलालांची चित्रे पुरस्कारप्राप्त ठरली. गोवा, हैदराबाद, अमृतसर येथील प्रदर्शनांमध्येही त्यांच्या चित्रांना पुरस्कार मिळाले. दलाल आर्ट स्टुडिओतर्फे प्रकाशित झालेली ‘शृंगार नायिका’, ‘चित्रांजली’, ‘भारताचे भाग्यविधाते’, ‘अमृतमेघ’ ही सचित्र पुस्तके रसिकमान्य ठरली.

मा.दीनानाथ दलाल यांचे १५ जानेवारी १९७१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..