पखवाज वादक गोविंद भिलारे जन्म ८ जून १९७४ रोजी झाला.
गोविंद भिलारे हे आजचे आघाडीचे पुण्यातील सुप्रसिध्द तरुण पखवाज वादक होते. गोविंद भिलारे यांनी सुरुवातीचे शिक्षण पं. रामदास पळसुले, नंतर तुकारामजी भूमकर, पेंडसे घराण्याचे सुप्रसिद्ध गुरू पंडित वसंतराव घोरपडकर यांच्याकडे झाले, तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. भिलारे यांनी भारतभरात वेगवेगळ्या सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये पखवाज सोलो वादन केले होते, तसेच त्यांनी पंडित जसराज, राहुल शर्मा, उल्हास पं. कशाळकर अशा दिग्गजांना साथ दिली होती.
पंडित गोविंद भिलारे यांचे २ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply