नवीन लेखन...

जगप्रसिध्द पनामा कालवा

पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रीम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.

४ मे १९०४ रोजी अमेरिकेने जगप्रसिध्द पनामा कालव्याचे अपूर्ण असलेले काम सुरू करून पूर्णत्वास नेले. १९९९ च्या अखेरपर्यंत या कालव्यावर अमेरिकेची मालकी अबाधित होती.

इ.स. १९१४ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.

ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रीम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.

अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये समावेश केला आहे.

पनामा कालव्याचा इतिहास

पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला वळसा घालून धोकादायक मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करावा लागत असे. मध्य युगापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती. पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते.

पवित्र रोमन साम्राज्याच्या पहिल्या कार्लोसने १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली अमेरिकेने पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात सुवेझ कालव्याचे निर्माण करण्यात फ्रेंचांना यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला. १८८१ साली फ्रान्सने पनामा कालव्याचे बांधकाम हाती घेतले. परंतु सुमारे २८ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व १८९० साली काम थांबले. पुढील १३ वर्षे अमेरिकेने अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर १९०४ साली राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी १९१४ साली कालव्याचे काम पूर्ण केले. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता.

संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..