काही माणसांमध्ये समोरच्या व्यक्तीचे अंतर्भूत् गूण ओळखण्याची एक विशेष दृष्टी असते. एकेकाळचा कॉमेडी किंग मेहमूद याच्याकडे ती दृष्टी होती. बरं नुसती दृष्टी असूनही भागत नाही त्या गुणानां संधी कशी व केंव्हा देता येईल याचाही ते विचार करतात. आज चित्रपटसृष्टीतल्या ज्या दिग्गजानांवर आपण मनापासून प्रेम करतो त्यात अमिताभ, आर.डी.बर्मन व राजेश रोशन यांचाही समावेश आहे. आणि या तिघानांही मेहमूदने मूख्य संधी दिली आणि या तिघानाही आपला अमीट ठसा उमटविला. आर.डी. बमर्न खरं तर खूप मोठ्या संगीतकाराचा मुलगा. वडील एस.डी.बमर्नची अनेक गाणी खरं तर स्वत: आरडीने कंपोज केली आहेत. मनात आणले असते तर त्यांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकिर्दीची वाट मोकळी केली असती पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणाऱ्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचीनदांनी शब्द टाकला नसावा.
मेहमूद हा फक्त एक कॉमेडियनच नाही तर निर्माता-दिग्दर्शक होता. स्ट्रगल करणाऱ्या कलावंताचे कलागूण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्याने आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढला व त्यात आरडी ला पहिली संधी दिली. यात विविध मूडची ९ गाणी होती. मॉर्डन डान्स, विरह गीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत पैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी “घर आजा घीर आए….” हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. या चित्रपटा पासून या दोघांच्या मैत्रीस सुरूवात झाली जी शेवट पर्यंत टिकली. पूढे आर.डी. बर्मनने चित्रपटसृष्टीत आपल्या आगळ्या रंगाने व ढंगाने चित्रपट संगीतात धूमाकूळ घतला. गमंत म्हणजे याच आरडीच्या बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग( बासू मनोहारी) या सहाय्यकानां मेहमूदने आपल्या ‘सबसे बडा रूपैय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली.( आठवा… ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..द होल थिंग)
१९६१ ला सुरू झालेला हा संगीतमय प्रवास १९९४ ला संपला. ३०० च्या आसपास गाणी देणारे आर.डी बर्मन चिऋपटसृष्टीत पचंम या नावाने ओळखले जात. संगीतातल्या सात सुरात सा आणि प हे दोन स्वर शुद्ध मानले जातात तर बाकीचे पाच स्वर दोन प्रकारात गणले जातात तीव्र आणि कोमल. संगीतातला प अर्थात पचंम ही आरडी ओळख ठरली. लहानपणी त्यानां टुबलू या नावाने सर्व हाक मारीत. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी एका गाण्याला चाल लावली ज्याचा पूढे सचिनदानी फंटूश या चित्रपटात वापर केला….”ये मेरी टोपी पलटके आ” हे ते गाणे. तसेच प्यासा ममधील “सर जो तेरा चकराये” याची चाल पण त्यानीच बांधली होती. परदेशी वाद्यां इतकाच देशी वाद्यांचा अप्रतिम वापर पचंम दा करीत असत. पूढे ते, आशाताई, किशोर व गुलजार यानीं चित्रपटसृष्टीला अप्रतिम गाणी दिली………………‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब- लता) मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले हे गाणे मेलडीचेउत्तम उदाहरण आहे……….. ‘दइया ये मैं कहां आ फंसी’ (कारवां-लता) यात हास्य निर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे……….’चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने- मन्नडे व लता) पाश्चीमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचमदानी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय. यातील ताल वाद्यांचा मेळ ऐकण्या सारखा आहे…………’पल दो पल का साथ हमारा’(बर्नींग ट्रेन- रफी व आशा) साहिरची ही कव्वाली पचंमदानी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे…………….’अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी’ (किताब) या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे……………….’मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ (इजाज़त- आशा भोसले) हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पचंमदाकडे पाठवले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती- ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत. याला कशी चाल लावायची?’ पण गुलजार यानां माहित होते पचंमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला…………………………..’तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी- किशोर लता) यातील मधून मधून पेरलेले संजीव कुमारचे संवाद आणि लता किशोरचा आवाज म्हणजे पचंमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर…………’चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं)या गाण्यात पाच सहा छोटीछोटी गाणी होती. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे……………’दम मारो दम’(हरे कृष्ण हरे रामा- आशा) या गाण्यातल्या सुरूवातीच्या गिटारच्या सुरांनी ७० च्या दशकातील पिढी पार वेडी झाली होती……………..’रैना बिती जाए’( अमर प्रेम- लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यानां फोन केला -‘’हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे,शुभेच्छा’’ म्हणाले. पण सचिनदा म्हणाले हे मी नाही पचंमने केले आहे तेव्हा मदन मोहन देखिल चकीत झाले………………………………बिती ना बिताई (परीचय- भूपेंद्र व लता)…………पचंमदाच्या गाण्याची यादी खूपच मोठी आहे…
रसिक प्रेक्षकातील प्रत्येकाला त्यांचे किमान एक तरी गाणे हे आवडतेच. ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत. सामता प्रसाद या विख्यात तबलजी कडून तबला वादनाचे धडेही त्यांनी गिरवले होते.शोले मधील चल धन्नो अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा ते पचंमदानी वाजवले होते. तसेच शोले मधील गब्बर जेव्हा जेव्हा येतो त्यावेळचे पार्श्व संगीत आठवून बघा….काचेच्या ग्लासाने या ध्वनीची निर्मिती त्यांनी केली होती…..त्यांनी स्वत:च्या वेगळ्या आवाजाचा देखील छान वापर करून घेतला………चित्रपट विश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात आपल्याला सोडून गेले. शुद्ध स्वराचे प्रतिक असलेला ‘पंचम’ सूर वयाच्या ५५ व्या वर्षी कोमल होऊन कायमचा विसावला.….
-दासू भगत (२७ जून २०१७)
Leave a Reply