पंढरीची वाट –
पाऊले चालती,
माऊली माऊली –
गजर मुखातुनी.
भागवताची पताका –
घेऊनी सोबत ,
भाबडे दिसे ते रूप –
वारकऱ्यांचे.
मनी एक भाव –
दर्शनाचा ठाव,
दुजा न विचार –
हृदयी वसे.
भजन कीर्तनाचा –
उसळे कल्लोळ,
टाळ मृदुंगाची मिळे –
साथ तया.
मेळा वारीचा –
वेगे वेगे चाले,
ओढ भेटीची मनी –
विठुरायाच्या.
कळस पडे दृष्टीस –
दुरून राऊळाचा ,
आस दर्शनाची –
वाढे अता .
क्षण एक मिळे रूप –
पहावया त्याचे ,
अष्टसात्विक जागती –
भाव सारे.
इतुक्या मायेने विठू –
घेती तुझे नाव,
दुजा कुणा नशिबी –
हे भाग्य नाही.
साजिरे गोजिरे उभे –
रूप पंढरीत,
वेड सकल जनां –
लावितसे,
वेड सकल जनां लावितसे.
राम कृष्ण हरी
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply