पंढरीच्या विठुराया,
आता उचल झडकरी,
काय ठेविले या दुनियेत,
वाट बघ मृत्यूची पाही,–!!!
चिंता, काळज्या, ताण,
जीवन का घेरलेले,
दिसत नाही कुठेही,
सुखाचे आभाळ भरलेले,–!!!
कोण म्हणतो मृत्यु भयानक,
तो तर हरीचा दूत असे,
समस्या आणि अडचणी,
यातून मुक्ती देत असे,–!!!
मज मोक्ष नको, स्वर्ग नको,
हवी आहे सुटका फक्त,
जिवाचा पक्षी अडकला,
उघड पिंजरा कर रिक्त,–!!!
जगण्याचा हेतू काय ,
जो आला तो गेला,
कष्ट, यातना, भोग, दुःखे,
यातून पुढे सुटून गेला,–!!!
ताणतणावांचा मारा,
अजून किती झेलायचा,
अंधारात चाचपडत जीव,
अजूंन किती घुसमटायचा,–!!!
स्वार्थ, अहम, सत्ता, पैसा ,
किती शत्रु अवतीभोवती,
सांभाळू कसे सगळे,
सोडवेल मुक्ती शेवटी,–!!!
जात पात धर्म वंश,
यातच समाज लडबडलेला,
आम्हीच श्रेष्ठ म्हणत,
संकुचित कातडे ओढलेला,–!!!
जिथे तिथे फसवणूक,
मोह अन् आकर्षणे,
फुटकळ गोष्टींची आज,
वाटती कशी भूषणे,–!!!
नीतिमत्ता, तत्वे, खरेपण ,
सारे गेले आहे कुठे ,
सगळीकडे केवळ दिसे जगण्यातील फोलपण–!
आज काल उद्याही,
कसे इथे रमायचे,
सांग या पोकळ दुनियेत,
मी जगायचे तरी कसे,–!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply